Sushma Andhare on ladki bahin yojana : लाडक्या बहिणीला दीड हजार देताय. आता या लाडक्या भावांनाही एक संधी द्यायला सरकारला काय हरकत आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केला. सुषमा अंधारे या पोलीस भरतीच्या आंदोलनावर सहभागी झाल्या होत्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुंबईतील आझाद मैदानात कालपासून पोलीस भरतीसाठी वयोमर्यादा उलटलेल्या उमेदवारांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात आज अंधारे सहभागी झाल्या होत्या. 


शासनाची चूक असूनसुद्धा यावर का निर्णय घेतला जात नाही?


2022-23 च्या शासन निर्णयानुसार 2023 मध्ये पोलीस भरती होणे अपेक्षित होतं. मात्र, ही पोलीस भरती 2024 मध्ये होत असल्यानं लाखो उमेदवारांचे वय एक वर्षांनी उलटून गेले आहे. त्यामुळं वयोमर्यादेची अट शिथिल करुन पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घ्यावे, यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारेंसह पोलीस भरतीचे उमेदवार आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. पोलीस महासंचालकांना अधिकाऱ्यांना जर वयोमर्यादेत वाढ करुन एक्सटेंशन दिलं जातं. तर मग या उमेदवारांना का दिल जात नाही? असा सवाल अंधारे यांनी केला. ही शासनाची चूक असूनसुद्धा यावर का निर्णय घेतला जात नाही? असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी सरकारला विचारला आहे. 


दोन वर्ष वयोमर्यादा वाढवावी, भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी उमेदवारांना एक संधी द्यावी


राज्यातील पोलीस भरतीची (Police Recruitment) तयारी करणाऱ्या तरुणाना वय वाढ मिळावी या मागणीसाठी मुंबई शहरातील आझाद मैदानावर आंदोनल सुरू आहे. या आंदोलनाला शिवसेना (उबाठा) पक्षाने पाठिंबा दर्शविला आहे. तसेच मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. 2022-23 मध्ये निघालेल्या पोलीस भरतीला शासन निर्णयानुसार डिसेंबर 2023 पर्यंतची वयोमर्यादा पात्र असायला हवी. मात्र सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे भरती प्रक्रिया 2024 मध्ये सुरू झाली. ज्यामुळे 2 लाख विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून बाहेर पडले आहेत. त्यामुळे दोन वर्ष वयोमर्यादा वाढवून भरती प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी या उमेदवारांना एक संधी देणे आवश्यक आहे. दरम्यान, 31 डिसेंबरच्या आधी भरती झाली असती तर आमच्यावर ही वेळच आली नसती, असे आंदोलक उमेदवारांचे म्हणणे आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी महिलांची प्रचंड धावपळ; नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय, म्हणाले...