Aaditya Thackeray : गेल्या दीड वर्षात राज्यातील उद्योग खातं पूर्णपणे फेल ठरल्याचे म्हणत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray ) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारच्या काळात अनेक उद्योह दुसऱ्या राज्यात गेले आहेत. आपल्या राज्यात एकही उद्योग आला नाही. आपण कसले उद्योग करतोय असे म्हणत आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली.
आदित्य ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी कणकवलीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. विधानसभा अध्यक्ष जर संविधानानुसार गेले तर त्यांना सरकारला अपात्र ठरवावचं लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार कायद्याने टिकू शकत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. हे सरकार महाराष्ट्रासाठी कधीही दिल्लीला गेले नसल्याचे ठाकरे म्हणाले.
सरकार वाचवण्यासाठी दिल्लीवारी
सध्याची स्थिती पाहता मंत्रीमंडळाचा विस्तार होईल असे वाटत नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले. संविधानाप्रमाणे तुम्ही गेलात तर हे सरकार बाद होणार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दिल्लीवारी ही या सरकारची नवीन नाही. सरकार वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवारी सुरु आहेत. महाराष्ट्र वाचवण्यासाठी यांच्या दिल्लीवाऱ्या नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
निवडणुका म्हणलं की हे सरकार घाबरुन पळून जाते
निवडणुका घ्या असे म्हणाले की हे सरकार घाबरुन पळून जाते असे आदित्य ठाकरे म्हणाले. आमदार नितेश राणेंनी केलेल्या आरोपाबद्दल देखील आदित्य ठाकरेंना विचारण्यात आले. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, काही प्रश्नांना मी उत्तरे देत नाही.
कोकणातील सगळे वातावरण भगवेमय
कोकणातील काही नेते संपर्कात असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावेळी सगले नेते संपर्कात असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. थांबा पिक्चर अभी बाकी आहे असेही म्हणाले. कोकणातील सगळे वातावरण भगवेमय आहे. आमच्यासोबत सगळे शिवसैनिक असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. कोणी कोठूनही निवडणुकीला उभं राहावं पण आधी निवडणुका तर घ्याव्यात असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: