Land Slide In Shahuwadi : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यामध्ये भुस्खलनाची घटना घडली. तालुक्यातील   करंजफेणमधल्या धावडाखिंडीमध्ये ही घटना घडल्यानंतर मातीचा ढिगारा बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी काम सुरु आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही मोठी हानी झालेली नाही. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र, दोन दिवसापासून थोडी उघडीप दिल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. 


गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी, गगनबावडा, राधानगरी या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. यामुळे कोल्हापूर येथील शाहुवाडी तालुक्यातील करंजफेण परिसरात भुस्खलन झाले. यामुळे मातीचा मोठ्या प्रमाणात ढिगारा रस्त्यावर आला असून, यामुळे येथील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती. मात्र, युद्धपातळीवर रस्त्यावर आलेला मातीचा ढिगारा आणि गाळ बाजूला करण्यात प्रशासनाला यश आले असून, वाहतूक पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.


शाहुवाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर आणि दऱ्या असल्याने वारंवार येथे अशा प्रकारच्या घटना घडत असतात. यासर्वांकडे जिल्ह प्रशासनाचं लक्ष असून कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये तसेच कोणतीही मोठी अप्रिय घटना घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन काळजी घेताना दिलू येत आहे.


दरम्यान, गेल्या 48 तासांमध्ये कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या 24 तासांमध्ये पंचगंगेची पातळी स्थिर असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज सकाळी 11 वाजता राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणीपातळी 41 फूट 7 इंच होती. गेल्या 24 तासात पासून पंचगंगेची पातळी स्थिर आहे. 


राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजे बंद झाल्याने चार गेटमधून पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरु आहे. साडेपाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 


इचलकंजीमध्ये पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल


धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे नदीपात्रामध्ये संथ गतीने वाढ होत आहे. इचलकरंजीमध्ये पंचगंगा इशारा पातळीकडे वाटचाल करत आहे. पुराचे पाणी नदी काठावरील स्मशानभूमी, वरद विनायक मंदिर, तसेच रेणुका मंदिर परिसरात आल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या