Sanjay Raut : निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरु आहेत. शिवसेना कोणाचे आणि राष्ट्रवादी कोणाची, हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष असल्याचे वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाच खासदार संजय राऊत यांनी केलं. पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे. पण  निवडणूक आयोगाला माहित नसल्याचे संजय राऊत म्हणाले.


बोगस प्रतिज्ञा पत्रांचा विषय शिवसेनेत देखील झालेला होता. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले पक्ष नाही. पक्षावर ताबा करण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस सर्टिफिकेट दिली होती. पण इलेक्शन कमिशनने त्याचा संदर्भ घेतला नाही. एकतर्फी निर्णय घेतला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील तोच प्रश्न उपस्थित होत आहे. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत, तरीही इलेक्शन कमिशनला प्रश्न पडतो की राष्ट्रवादी कोणाची असे राऊत म्हणाले. देशाचं दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशनला कळत नाही या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाकडे आहे.


शिवसेना बाळासाहेब यांची होती आणि पुढेही राहील 


पूर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या, इतिहासात ज्या कबील्यांचा ताब्या घ्यायच्या आणि लुटमार करायच्या. आता अशा राजकारणात भाजपने टोळ्या निर्माण केल्या आहेत. पक्षांचा ताबा घेतला जातोय. घटनात्मक संरक्षण त्यांना दिलं जातंय हे दुर्दैव असल्याचे संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगानं काहीही निर्णय घेऊ द्या, शिवसेना बाळासाहेब यांची होती आणि पुढेही राहील असे संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोग हे घटनात्मक संस्था आहे, पण सध्या पिंजऱ्यातला प... झाला  असल्याचे राऊत म्हणाले. हे देशातील न्यायव्यवस्थेचा दुर्दैव आहे की सामान्य माणसाला तारखांवर तारखा देऊन देखील न्याय मिळत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे, त्यांनी कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही. कोणाची तरी पिल्लावळ असते ती आमच्या विरोधात याचिका दाखल करतात असे राऊत म्हणाले. कुणीतरी प्रायोजित केलेली व्यक्ती तुमच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करत आहे. सर्वोच्च न्यायालयाची अवस्था देखील तारीख पे तारीख अशी होऊ नये यासाठी चंद्रचूड यांनी स्पष्ट केल्याचे राऊत म्हणाले.


2024 मध्ये महाराष्ट्रात भाजपचा पराभव होणार


2024 मध्ये महाराष्ट्रात जो निकाल लागणार आहे, त्यामध्ये भाजपचा दारुण पराभव होणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे नेते मध्य प्रदेशमध्ये जाऊन प्रचार करत आहेत. या नेत्यांना महाराष्ट्रात कोणी विचारत नाही असा टोला राऊतांनी लगावला. मध्य प्रदेशमध्ये भाजपचा पराभव होतोय, त्यामुळं महाराष्ट्र वाऱ्यावर सोडून राज्यातील भाजपाचे सगळे मंत्री वाऱ्यावरची वरात करत आहेत. त्या वरातीतल्या घोड्याला आपला निकाल लागल्यावर कळेल की तो किती मागे पडला आहे, उगाच घोडे कशाला नाचवत आहात असे राऊत म्हणाले. जावेद अख्तर यांना मी ओळखतो ते एक सेक्युलर लेखक आहेत. जावेद अख्तर यांनी जे मत व्यक्त केलं आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे असेही राऊत म्हणाले. 


 



महत्त्वाच्या बातम्या:


Sanjay Raut: निवडणूक आयोग आणि ईडी केंद्र सरकारचे पोपट, खासदार संजय राऊतांची टीका