Manoj Jarange Patil : मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्या, उगाच गाजर दाखवू नका असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं. ओबीसीमध्ये आमचं आरक्षण आहे ते आम्हाला मिळावं. त्यामुळं ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले. ठरल्याप्रमाणे Time Bond तातडीने द्यावा आणि संख्याबळ वाढवून नोंदी शोधा. मनुष्यबळ वाढवा 24 डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला.
सरकारबाबत मी सॉफ्ट नाही
स्वतः मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी अशी माझी विनंती असल्याचे पाटील म्हणाले. उपोषण सोडताना जे ठरलं होतं त्याबाबत अजून सरकारने Time Bond दिला नाही, तो तातडीने द्यावा ही विनंती. बच्चू कडूंसोबत विशेष चर्चा झाली नाही, ते भेटायला आले, फक्त त्यांना आठवण दिली आपलं जे ठरलं ते द्यायला सांगा, सरकारला आठवण करुन द्या असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारबाबत मी सॉफ्ट नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले.
कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो
कार्तिकी पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, आम्हाला हेच खूप झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले. सही कुणी त्यावर करत नसेल तर त्यांना जड जाईल, हातात टाकत नसेल तर दिवाळीचा फराळ खाऊन सह्या कराव्या. फक्त निव्वळ साह्यासाठी time bond अडकले असेल तर योग्य नाही. नाहीतर जड जाईल असा इशारा जरांगे पाटील यांनी दिली. धनगर समाज आता जागा झाला आहे, त्याचा मला खूप आनंद झाला. धनगर बांधव एकत्र आले तर न्याय मिळेल आणि आम्ही दोघे एकत्र आलो तर सरकारची फजिती होईल असे जरांगे पाटील म्हणाले.
सरकारनं ओबीसी नेत्यांचे लाड करु नये
ज्यांच्या नोंदी कुणबी असेल त्यांना आरक्षण मिळायला हवे. सरकारनं नोंदी शोधण्यात निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नसता आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, खोटी फसवणूक मराठा समाज सहन करणार नाही असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये असेही जरांगे पाटील म्हणाले.