Pratap Sarnaik on ED Enquiry : राजकीय नेता म्हणून अशा गोष्टींना सामोरं जावं लागत आहे. केंद्र आणि राज्य यांच्या संघर्षातून ही कारवाई होत असल्याचं सूतोवाच प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. तसेच, भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. तीन दिवसांच्या आत ईडीच्या या नोटीसविरोधात मी कोर्टात अपील करणार असल्याचं देखील प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, "गेल्या आठवड्यात माझं राहतं हिरानंदानी येथील घर आणि मिरा रोड येथील जमीन अशा दोन मालमत्ता जप्त केल्यासंदर्भात मला आणि माझ्या कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया मी पूर्ण करतोय. भारतीय न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. त्यामुळे ईडी कारवाई विरोधात 30 दिवसांच्या आत अपील करणार आहे. त्यानंतर न्यायालय जो निर्णय देईल, त्या निर्णयाला अधीन राहून मी पुढची कारवाई होईल." पुढे ते म्हणाले की, "हे 2022 आहे आणि 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर ईडीनं कारवाई केली होती. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यानंतर माझ्यावरील ती पहिली कारवाई होती. पण त्यानंतर अनेक लोकांवर कारवाई झाली. पण तेव्हा सगळ्यांनी मला तुमचं काही संपलेलं आहे का? असा प्रश्न विचारला. मी त्यावेळी सांगितलं की, माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे."
"शिवसेनेचा प्रवक्ता म्हणून मी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर टाकलेला हक्कभंग आणि त्यानंतर माझ्यावर झालेली कारवाई. कदाचित केंद्र आणि राज्य यांच्यातील संघर्षामुळे माझ्यावर ती कारवाई झालेली असेल. आता अनेकांवर, राज्यातील सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर या कारवाया होत आहेत. पण माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास असल्यामुळे मी भविष्यातही सुरु ठेवीन."
दरम्यान, शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची 11.35 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. NSEL घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ठाण्यातील दोन फ्लॅट जप्त केले आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीच्या या कारवाईनंतर शिवसेना आणि भाजप यांच्यात सुरू असलेले आरोप-प्रत्यारोपाला आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Pratap Sarnaik : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक अडचणीत; ईडीकडून11.35 कोटींची संपत्ती जप्त