औरंगाबाद : औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर आनंद झाला. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावे ही मागणी आधी बाळासाहेब ठाकरेंनी केली होती. त्यामुळे येत्या 23 जानेवारीला तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या जयंती दिवशी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावं अशी विनंती शिवसेना नेते आणि औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.
औरंगाबादच्या नामांतराला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध नाही. कॉंग्रेसही विरोध करणार नाही. या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये काहीही ही मतभेद होणार नाहीत. मध्यवर्ती निवडणुका तर शक्य नाहीत. एमआयएम विरोध करत आहे, मात्र त्यांच्या विरोधाला आम्ही घाबरत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मी औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यात यावे यासाठी चार स्मरण पत्र लिहिली आहेत. त्यांची उत्तर देखील आली असल्याचा चंद्रकांत खैरे यांचा दावा केला आहे.
धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत औरंगजेब बसत नाही - मुख्यमंत्री
औरंगाबादच्या संभाजीनगर नामकरणाचा विषय त्यात नवीन काय केलं मी. जे वर्षानुवर्ष बोलत आलो आहे तेच केलं आहे आणि तेच स्वीकारणार, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. यावेळी त्यांना काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेल्या नाराजीबद्दलही विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, औरंगजेब काही धर्मनिरपेक्ष नव्हता. त्यामुळे आमच्या अजेंड्यात धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे त्याच्यात औरंगजेब बसत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
संबंधित बातम्या
- CMOच्या ट्विटरवर पुन्हा औरंगाबादचा नामोल्लेख 'संभाजीनगर', काँग्रेसच्या विरोधानंतरही ट्वीट
- औरंगाबाद शहराचं नामांतर करण्याच्या हालचाली ठाकरे सरकारकडून सुरु
- 'औरंगाबाद की संभाजीनगर' काय आहे इतिहास, जाणून घ्या
- आमचं उष्ट कोणी खाऊ नये.. औरंगाबादच्या नामकरणावरुन गुलाबराव पाटलांचा मनसेला खोचक टोला