भंडारा : संपूर्ण देशाचं मन हेलावणारी घटना महाराष्ट्रातील (Bhandara) भंडारा येथे घडली. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री जवळपास दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. या युनिटमध्ये एकूण सतरा बालकं होती. त्यापैकी सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे.


राज्य सरकारकडून दुर्घटनेतील पिडीत कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून  प्रत्येकी  पाच लाख रुपयांची मदत  करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती  राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असून, यात कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचं देखील राजेश टोपे यांनी सांगितले.


दुर्घटनेतील मृत बालकांच्या मातांचा आक्रोश; रुग्णालयावर गंभीर आरोप


भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तात्काळ चौकशीचे आदेश


भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे . त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.


दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवा आणि राज्यातील सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश


भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशु केअर युनीटला आग लागून झालेल्या बालकांचा मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक असून सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनेच्या तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. संबंधित दुर्घटेनेस दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी राज्यातील अन्य रुग्णालयातील शिशू केअर युनीटचे तातडीने ऑडीट करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


Bhandara Fire | भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात आग,10 बालकांचा मृत्यू; रात्री नेमकं काय घडलं?


तेव्हा आता सक्तीच्या चौकशीच्या आदेशानंतर या प्रकरणी नेमकं कोणाला दोषी ठरवण्यात येतं आणि कोणावर कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.