औरंगाबाद: काही दिवसांपूर्वी विरोधकांनी जल आक्रोश मोर्चा काढला होता, तो आक्रोश संभाजीनगरच्या पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेल्याचा आक्रोश होता असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. पाच वर्षांपूर्वी तेच सत्तेत होते, त्यांनी पाण्यासाठी काय केलं याचा हिशोब द्यावा असंही आव्हान त्यांनी भाजपला दिलं. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. 


मराठवाड्यातील शिवसेनेची पहिला शाखा औरंगाबादमध्ये 8 जून 1985 रोजी स्थापन करण्यात आली होती. या शाखेच्या 37 व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. 


संभाजीनगरच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांमध्ये इथला पाणीप्रश्न बिकट झाला होता. या आधी पाच- दहा दिवसांनंतर पाणी यायचं, ते आता कमी झालं आहे. जुनी योजना आहे ती गंजून-सडून गेली आहे. संभाजीनगरसाठीच्या नवी योजना मी पूर्ण करणार, त्यासाठी प्रशासनाला आदेश दिले आहेत. इथल्या योजनेला एक पैसाही कमी पडू देणार नाही. कंत्राटदार जर यामध्ये वेळकाढूपणा करत असेल तर त्याला तुरुंगात टाका असा आदेश दिला आहे.


उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज संभाजीनगरमध्ये पाणीपट्टी अर्ध्यावर आणली आहे, त्याची अंमलबजावणी ही येत्या 15 दिवसात केली जाणार आहे. इथल्या युवकांना रोजगार देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या कंपन्यांनी संभाजीनगरमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचे रस्ते पाहा, किती चांगले झाले आहेत."


उद्धव ठाकरे म्हणाले की, "काश्मीर पंडितांवर पुन्हा तीच वेळ, कुणालाच काही पडले नाही. तिकडे जाऊन चालिसा पढा. नामर्दाच हिंदुत्व आमच नाही पहिले तिकडे जा. मी बाळासाहेब हे मध्ये नाव आहे म्हणून मी आहे. पण त्यांचे हिंदुत्व आम्ही शिकलो. मला देवळात घंटा बडवणारा नाही अतिरेकी बडवणारा. हिंदू हित की बात करेंगा ही तव्हाची घोषणा. कोर्टाचा निर्णय तुमचा नाही. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व. बेलगाम सुटलेले भाजपचे प्रवक्ते. जर आमच्यावर वेडी वाकडी टीका केली तर आम्ही पण सोडणार नाही. हा हिंदुत्वाचा, वारकरी भगवा. इकडे चालिसा तिकडे जाऊन शिव्या द्यायचा. इतकी वर्ष शिवसेनाप्रमुखांनी इस्लामचा मुसलमानाचा द्वेष करा असे सांगितले नाही. इतरांचा द्वेष करायचा नाही. देश हाच माझा धर्म. धर्माच्या आड कुणी अंगावर आला तर सोडणार नाही."