Shivjayanti 2022 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दरवर्षी प्रमाणे राज्यात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती जोरदार होत आहे. महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे अमित राज ठाकरे यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजन करण्यात आले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून करण्यात येणार आहे. 


मनसेकडून अशी साजरी होणार शिवजयंती



  • प्रत्येक विभागात शिवजयंती साजरी होणार

  • दादरमध्ये महिलांची रॅली निघणार

  • मुंबईभरातले मनसैनिक पार्कात एकवटणार

  • राज ठाकरे सहकुटुंब पार्कात उपस्थित राहणार

  • विभागवार शिवजयंतीचे रथयात्रा निघणार 


महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी येथे मनसे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे हे अभिषेक आणि पूजन करणार आहेत. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षी प्रमाणे मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि सरचिटणीस शालीनी ठाकरे यांनी केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने ढोलताशांच्या गजरात हा भव्यदिव्य सोहळा शिवतीर्थ, दादर परिसरात होणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



 LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha