Sumant Ruikar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी तिरुपती बालाजीकडे पायी प्रवास करत साकडे घालण्यासाठी निघालेल्या कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचा वाटेतच मृत्यू झाला. सुमंत रुईकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य मिळावे म्हणून बीडमधून तिरुपतीला पायी जाण्याचा संकल्प केला होता. त्यांनी 1100 किमी पायी चालत जाण्याचा निश्चय केला होता. ते 1 डिसेंबरपासून तिरुपतीच्या दिशेने निघाले होते. मात्र तिरुपतीला पोहोचण्यापूर्वीच त्यांना मृत्युनं गाठलं.
"राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीडहून तिरुपती बालाजी पर्यंत पायी चालत जाण्याचा संकल्प करणारे ज्येष्ठ शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे कर्नाटक मधील रायचूर येथे तब्येत बिघडल्याने अचानक निधन झालं. या कट्टर शिवसैनिकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन ही यात्रा चालू केली होती. त्यांच्या अकाली जाण्यानं त्यांचे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं आहे. रुईकर यांच्या कुटुंबियांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेनेकडून उचलण्यात येत आहे.त्यांना काहीही कमी पडू दिले जाणार नाही", असं ट्विट शिवसेना नेते एकनाथ खडसे यांनी केलंय.
एकनाथ शिंदे यांचं ट्वीट-
सुमंत रुईकर आणि त्यांचा मित्र शुभम जाधव यांचं दोघे रोज 35 किलोमीटर पायी चालत 31 डिसेंबरपर्यंत त्यांना तिरुपती बालाजीला पोहोचायचे नियोजन होते. शनिवारी ते कडप्पापर्यंत पोहोचले. पण रोज तीस-पस्तीस किलोमीटर चालण्यामुळे सुमंत रुईकर थकले होते. त्यातच त्यांना ताप आला. त्या अवस्थेत देखील त्यांना पुढे जायचे होते. त्यांच्या मित्राने हे घरी कळवले आणि घरच्यांनी त्यांना परत येण्याची विनंती सुद्धा केली होची मात्र त्यांनी कुणाचंही ऐकलं नाही. रुईकर यांच्या अंगात ताप होता. पायात त्राण नव्हता तरी ते चालत राहिले आणि रायचूरपासून तिरुपतीच्या दिशेने 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला कोसळले.
अखेर मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी सुमंत रुईकर यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस त्यावर रायचूरचा पत्ता मिळाला बीडहून सुमन तोडकर यांचे मित्र मंडळ रायचूरला पोहोचले. दरम्यान सुमंत तिथे बेशुद्ध अवस्थेत पडले होते. रायचूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, तोपर्यंत त्याच प्रकृती खालावली होती. अखेर सुमंत रुईकर यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यापूर्वी 2019 मध्ये ही उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आहे. सुमंत रुईकर यांनी बीड ते तिरुपती बालाजीची पायी यात्रा पूर्ण केली होती. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी सुमंत रुईकर यांच्या निष्ठेचे कौतुक सुद्धा केले होता आणि त्याचा सत्कार देखील केला होता.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- 'स्क्रिन टाइम' जास्तच वाढतोय, पुस्तक वाचन वाढणं गरजेचं, पंतप्रधानांचा सल्ला, पुण्याच्या 'या' संस्थेचं केलं कौतुक
- मी तसं म्हणालोच नाही, कृषी कायद्यासंदर्भातील 'त्या' वक्तव्यावर कृषीमंत्री तोमर यांचे स्पष्टीकरण...
- Covid Third Wave in India: देशात जानेवारीत येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट, एक्सपर्ट कमिटीनं सांगितलं कारण