PM Narendra Modi Mann Ki Baat :  पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) 'मन की बात' (Mann Ki Baat) कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. या संवादात पंतप्रधान मोदी यांनी पुस्तक वाचनाचं महत्व सांगितलं. पंतप्रधान मोदी म्हणाले की, पुस्तकं  -ग्रंथ काही फक्त ज्ञान देतात असं नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचं, आयुष्य घडवण्याचंही काम करतात, पुस्तक वाचण्याच्या छंदामुळं एका अवर्णनीय आनंदाची अनुभूती मिळते. आजकल मी पाहतो की, अनेक लोक आपण यावर्षी किती पुस्तकं वाचली हे अतिशय अभिमानानं सांगत असतात. तसंच आता यापुढे मला अमूक पुस्तकं वाचायची आहेत, असंही सांगतात. हा एक चांगला कल आहे आणि तो वाढला पाहिजे, असं मोदी म्हणाले.


पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी ही ‘मन की बात’च्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही या वर्षात वाचलेल्या, आपल्याला आवडलेल्या पाच पुस्तकांविषयी सांगावं. यामुळे 2022मध्ये इतर वाचकांना चांगली पुस्तकं  निवडण्यासाठी तुमची मदत होऊ शकेल. सध्याच्या काळामध्ये आपला ‘स्क्रिन टाइम’ थोडा जास्तच वाढतोय, त्यामुळे पुस्तक वाचन जास्तीत जास्त लोकप्रिय बनलं  पाहिजे, यासाठीही आपण सर्वांनी मिळून, एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत, असंही मोदी म्हणाले. 
 
भांडारकर इन्स्टिट्यूटचं केलं कौतुक
पंतप्रधान मोदी म्हणाले की, अलिकडेच माझं लक्ष एका संस्थेनं सुरू केलेल्या वेगळ्या प्रयत्नाकडे वेधलं गेलं. हा प्रयत्न आपल्या प्राचीन ग्रंथांना आणि सांस्कृतिक मूल्यांना केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये लोकप्रिय बनविण्यासाठी केला गेला आहे. पुण्यामध्ये भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर ही संस्था आहे. या संशोधन केंद्रामार्फत इतर देशांच्या लोकांना महाभारताच्या महत्वाविषयी परिचय करून देण्यासाठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू केला आहे. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरातला अभ्यासक्रम अलिकडेच सुरू झाला असला तरी तो तयार करण्याला प्रारंभ तर 100 वर्षांपूर्वी झाला  होता. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराप्रमाणेच आपल्या परंपरेमधले वेगवेगळे पैलू कशाप्रकारे आधुनिक पद्धतीने प्रस्तुत केले जात आहेत. सातासमुद्रापल्याडच्या लोकांपर्यंत त्याचा लाभ कसा मिळू शकेल, यासाठीही नवोन्मेषी कल्पना, प्रत्यक्षात आणल्या जात आहेत.


84 वर्षांच्या डॉक्टर कुरेला विठ्ठलाचार्य यांचं उदाहरण
पंतप्रधान मोदी म्हणाले की, तेलंगणाचे डॉक्टर कुरेला विठ्ठलाचार्य जी. त्याचं वय 84 वर्ष आहे. उदाहरण आहेत, की जेव्हा आपल्याला आपले स्वप्न पूर्ण करायची जिद्द असते, तेव्हा वय आडवं येत नाही, याचं विठ्ठलाचार्य हे उदाहरण आहेत. विठ्ठलाचार्यजींची लहानपणापासून एक इच्छा होती की एक मोठं वाचनालय सुरु करावं. देश तेव्हा गुलामीत होता, काही परिस्थितीमुळे त्यांचं ते स्वप्न तेव्हा स्वप्नच राह्यलं. 6-7 वर्षांपूर्वी ते पुन्हा एकदा आपलं स्वप्न साकार करण्याच्या कामाला लागले. विठ्ठलाचार्य यांनी स्वतःची पुस्तकं वापरून वाचनालय सुरु केलं. आपली आयुष्याची सगळी कमाई त्यांनी या कामात लावली. हळूहळू लोक सोबत येत गेले आणि योगदान देऊ लागले. यदाद्रि-भुवनागिरी जिल्ह्याच्या रमन्नापेट भागातल्याया वाचनालयात आज जवळजवळ २ लाख पुस्तकं आहेत. विठ्ठलाचार्य यांना बघून आज खूप आनंद होतो की मोठ्या संख्येत विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून प्रेरणा घेऊन इतर गावातील लोक देखील वाचनालय उभारण्याच्या कामी लागले आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha





इतर महत्वाच्या बातम्या


PM Modi about Vaccine for children : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून तीन मोठ्या घोषणा, बूस्टर डोसबाबतही महत्त्वाची माहिती


PM Modi Speech Highlight : 15 ते 18 वयोगटातील मुलांचं लसीकरण 3 जानेवारीपासून सुरू : पंतप्रधान मोदी


COVID-19 Vaccine for Children : 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला DCGI ची परवानगी