Sanjay Raut : "2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि बरेच लोक बेरोजगार झाले असतील, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
भाजप नेते नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्यावर अनेक आरोप केले. त्यामध्ये त्यांनी संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, "मी प्रखर राष्ट्रवादी आणि राष्ट्रभक्त आहे. माझा कोणाच्या खुर्चीवर डोळा नाही. आमचा फक्त शिवसेनेच्या विस्तारावर डोळा आहे, बाकी कशावर नाही. 2024 पर्यंत शिवसेना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल आणि त्यावेळी बरेच लोक बेरोजगार झाले असतील," असा टोला संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.
नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना नेते विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या आरोपांना उत्तर दिले. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, "कोण काय म्हणाले? हे मला माहीत नाही. परंतु, मी आता विनायक राऊत यांची पत्रकार परिषद पाहिती. त्यांनी या पत्रकार परिषदेमधून शिवसेनेची भूमिका जोरदार पद्धतीनं मांडली आहे."
काय म्हणाले नारायण राणे?
''स्वत: शिवसेनाप्रमुख असलेल्या अविर्भावात संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत राऊतांनी वापरलेले शब्द एखाद्या वृत्तपत्रकाच्या संपादकाला शोभणारे नव्हते. पत्रकाराला ही शोभणारी भाषा नव्हती. राऊतांनी काल पत्रकार परिषदेत बेताल आरोप केले आहेत. प्रविण राऊत यांनी ईडीला दिलेल्या मुलाखतीनंतर राऊत घाबरले आहेत. भाजपवर आरोप केले. परंतु कोणेतेही पुरावे दिलेले नाहीत.
''संजय राऊत यांना वैद्यकीय उपचाराची गरज''
दरम्यान, यावेळी नारायण राणे यांनी संजय राऊत यांना वैद्यकीय उपचाराची गरज असल्याचे म्हटले आहे. "बाळासाहेबांचे आशीर्वाद आहे असे म्हणाले, संजय राऊत शिवसेनेत 1992 मध्ये आले. संजय राऊत यांचा तोल गेला असून त्यांना वैद्यकीय उपचाराची गरज आहे. तसेच संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेणं थांबवावे आणि जे ओढावलं आहे, त्याला सामोरे जावं असा सल्ला नारायण राणेंनी संजय राऊत यांना दिला आहे.
महत्वाच्या बातम्या