या विषयी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आतापर्यंत कधी भीती वाटली नाही आणि यापुढेही वाटणार नाही. मी अनेकांचे भ्रष्टाचार आणि घोटाळे उघडकीस आणले आहेत. आता आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात काम यापुढेही सुरुच राहील, माझं जे काम आहे ते मी सुरुच ठेवणार आहे. तसंच आपण असल्या धमक्यांना भीक घालत नाही. दरम्यान या धमकीबाबत आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहिती दिली आहे का ? असे विचारले असता आपण मुख्यमंत्र्यांना अशी माहिती दिली नाही. मात्र भाजपाचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला असंही सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे.
Kirit Somaiya | 'शिवसेनेकडून जीवाला धोका', किरीट सोमय्यांचं राज्यपालांना पत्र | ABP Majha
मुंबई महापालिकेच्या कारभारावरुन किरीट सोमय्यांनी शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनीही सोमय्यांवर टीका केली होती. सोमय्या आणि पेडणेकर यांच्यातील सामना अजूनही शिवसैनिकांच्या लक्षात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपाची युती तुटली होती. त्यावेळी सोमय्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार चालतो, असे घणाघाती आरोप त्यांनी केले होते. त्यानंतर सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील दरी वाढत गेली. लोकसभा निवडणुकीवेळी शिवसैनिकांनी सोमय्यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला. यानंतर भाजपानं सोमय्यांचं तिकीट कापत मनोज कोटक यांना उमेदवारी दिली होती.