Deepak Kesarkar On Shiv Sena Uddhav Thackeray : कोरोना काळात (Coronavirus) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सर्वात जास्त काम केलं. त्यांनी जे काम केलं ते आपल्या पक्षप्रमुखांना दिलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांना दोन वेळा कोरोना (Coronavirus) झाला होता, असे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak kesarkar) म्हणाले. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलें. यावेळी बोलताना ते म्हणाले की, युती शासन होतं त्यावेळी मुख्यमंत्री निधीतून 3 लाख रुपये दिले जायचे. मागचा सरकारने यात घट केली होती. आता मात्र आम्ही ही रक्कम वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. 


केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, 'उध्दव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. आम्ही सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो. त्यांच्याकडून हिंदुत्वासंदर्भात चांगल काम घडावं. आम्ही अगोदरच जाहीर केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारं नाही. मुलाखतीवर अनेक प्रतिक्रिया आल्या. माझं म्हणणं आहे की वाढदिवसाचा चांगला प्रसंग आहे, त्यावेळीं असे प्रश्न विचारणं चुकीचं आहे. महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळी सर्वात मोठा वाटा संजय राउत यांचा होता.' 


मंत्रिमंडळ विस्तारासाठी काहीच अडचण नाही. दक्षिणेतदेखील एक मुख्यमंत्री असे आहेत, जे बहुमत असून देखील तीन महिने एकटेच सरकार चालवत होते. अटलबिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, त्यावेळी 50 टक्क्यांचा विषय झाला होता. गोव्यात 40 आमदार आहेत तिथं केवळ 6 मंत्री होऊन उपयोग नाही. तिथं 12 मंत्री आहेत. महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळीदेखील दहाच मंत्री होते. आणि महत्त्वाचं म्हणजे अजूनही एका आमदारांनी देखील काही वक्तव्य केलं नाही. काल आम्हाला म्हणण्यात आलं की सपा किंवा एमआयएम मध्ये सहभागी व्हा. हे चुकीचं आहे, असेही केसरकर म्हणाले. 


औरंगाबाद नामकरण करण्याचं कारण संभाजीराजे यांचं स्मरण व्हाव यासाठी आम्ही निर्णय घेतला आहे. कारण त्यांना धर्मवीर संभाजीराजे म्हटल जातं. औरंगजेब राजाने त्याना हाल हाल करुन मारलं परंतु संभाजीराजे यांनी शेवट पर्यंत धर्मबदल केला नाही, असे केसरकर म्हणाले. आदित्य ठाकरे यांना विचारच आहे की, तुम्हाला भाजप-शिवसेना असं निवडूण दिलं होतं, असे दीपक केसरकर म्हणाले. आदित्य ठाकरे यांनी आम्हाला निवडूण या असं चँलेंज केलं. पण असं चॅलेंज करणं चुकीचं आहे, असेही केसरकर म्हणाले.  


इतर महत्वाच्या बातम्या


Deepak Kesarkar : ...तर सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेईन : दीपक केसरकर 


Sharad Pawar : तुम्ही तीन वेळा शिवसेना फोडली, दीपक केसरकरांच्या आरोपावर शरद पवार म्हणतात...


मी प्रत्यक्ष नारायण राणेंशी बोलेन, त्यांच्या मुलांशी नाही, कारण तेवढा मी सिनियर : दीपक केसरकर