Birthday Wishes To Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. सर्वपक्षीय नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. अशात उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील त्यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. एक खास फोटो सोशल मीडियावर टाकत आदित्य यांनी आपल्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.
फोटो शेअर करत आदित्य यांनी म्हटलं आहे की, माझ्या वडिलांना आणि माझ्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जे मला दररोज प्रामाणिकपणे आणि दयाळूपणे मी करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन देतात. माझ्याकडून गोष्टी अधिकाधिक चांगल्या होण्यासाठी प्रेरित करतात, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गर्दी
उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. शिवसैनिकांच्या प्रेमापोटी उद्धव ठाकरे हे सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शुभेच्छांचा स्वीकार करणार आहेत. पण फक्त शुभेच्छा द्या, हारतुरे नको, पुष्पगुच्छ आणि फोटोफ्रेम्स नको, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केलं आहे. त्यांच्या आवाहनानंतर शुभेच्छा द्यायला मोठी रीघ मातोश्रीवर लागली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकानं रक्तानं रेखाटलं पोर्ट्रेट
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एका शिवसैनिकानं रक्तानं पोर्ट्रेट रेखाटून शुभेच्छा दिल्या. उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांनी आज मातोश्री निवासस्थानाबाहेर गर्दी केली आहे. त्यात एका शिवसैनिकानं आणलेलं पोर्ट्रेट सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं. या शिवसैनिकानं उद्धव ठाकरे यांचं पोर्ट्रेट रक्तानं रेखाटून त्यावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपण उद्धव ठाकरेंबरोबर आहोत हे सांगण्यासाठी असं चित्र रेखाटल्याचं त्यांनी सांगितलं.
बंडखोर आमदार, खासदारांच्या जाहिराती 'सामना'नं नाकारल्या
शिवसेनेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सामनात बंडखोर आमदार खासदारांनी जाहिराती दिल्या खऱ्या, पण सामनानं या जाहिराती नाकारल्या.शिंदे समर्थक खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिलीय. बंडखोरांकडून शुभेच्छांच्या जाहिराती सामनातून नको अशी भूमिका शिवसेनेनं घेतल्याचा त्यांचा दावा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या