Nilesh Rane Reaction on Sanjay Raut : चोरी पकडली जाऊ नये, म्हणून राऊत बॅकफूटवर गेले - निलेश राणे

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त केल्यानंतर आता माजी खासदार निलेश राणे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Continues below advertisement

Sanjay Raut Property Seize by ED : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची संपत्ती ईडीकडून (ED) जप्त केल्यानंतर आता विविध स्तरातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. यामध्ये माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी खोचक प्रतिक्रिया देत राऊंतावर टीकादेखील केली आहे. यावेळी राऊतांवर कारवाई झाली यात नवीन काहीच नाही. त्यांच्यावर कारवाई होणार नाही, तर कोणावर होणार? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे. 

Continues below advertisement

राणेंनी पुढे बोलताना राऊतांनी याआधीही इन्कम टॅक्सचे पैसे चोरले होते, चोरी करण्यात त्यांचा जुना हात असतो. त्यामुळे ईडीने केलेली ही कारवाई रितसर असल्याचंही ते म्हणाले. तसंच राऊत यांनी त्यांच्या जिवाला धोका असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना राणे यांनी संजय राऊत भरकटले आहेत, ते शुद्धीत बोलतात का? असा सवाल करत चोरी पकडली जाऊ नये, म्हणून ते बॅकफूटवर गेले असल्याचं म्हटलं आहे. तसंच राऊत किती मोठे फ्रॉड आहेत? हे महाराष्ट्राला कळेल. असंही राणे म्हणाले. 

ईडीची राऊतांवर कारवाई

अंमलबजावणी संचलनालयानं (ED) शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मोठा दणका दिला आहे. ईडीनं संजय राऊत यांची अलिबाग आणि दादरमधील संपत्ती जप्त केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीमध्ये अलिबागमधील आठ भूखंड आणि दादरच्या फ्लॅटचा समावेश आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली आहे. मुंबईतील एक हजार 34 कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांना ईडीनं काही दिवसांपूर्वी अटक केली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात याच घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय ईडीला आहे. याच पार्श्वभूमीवर ईडीनं कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola