Maharashtra Kesari : महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. या खेळात आधी पुरुषांचाच सहभाग होता. मात्र आता अनेक महिला देखील सध्या कुस्तीकडे वळत आहेत, सन 1969 पासून महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari kusti spardha) ही कुस्ती स्पर्धा भरविण्यात येते. मात्र यात केवळ पुरूषांचा सहभाग असतो, आता महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद  (Dipali Saiyyad) यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. आज याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेतली. यावेळी त्यांनी लवकरच या संदर्भातली घोषणा होईल असे सांगितले. 


शरद पवार यांची भेट, लवकरच होणार घोषणा 
दीपाली सय्यद यांनी महिलांसाठी महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्याची मागणी केली आहे. आज याबाबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. लवकरच या संदर्भातली घोषणा होईल, महाराष्ट्र मध्ये पहिल्यांदा महिला कुस्तीगीरांसाठीही संधी उपलब्ध होईल असे त्या म्हणाल्या आहेत. हरियाणामध्ये कुस्तीगिरांना प्रोत्साहन देण्यासाठी इतक्या वेगवेगळ्या योजना चालवल्या जातात, महाराष्ट्रामध्येही क्षमता आहे, आपणही ते करायला पाहिजे.असंही सय्यद म्हणाल्या आहेत.


महिला मल्लांसाठी ठरणार क्रांतिकारी घोषणा
 महाराष्ट्राला कुस्तीची मोठी परंपरा आहे. या खेळात आधी पुरुषांचाच सहभाग होता. मात्र आता महाराष्ट्रातही अनेक मुली सध्या कुस्तीकडे वळत आहेत. अनेक महिला मल्ल अनेक स्पर्धा खेळत आहेत, दरम्यान, महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरविण्यात येते. मात्र यात केवळ पुरूषांचा सहभाग असून कुस्तीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Saiyyad) यांनी काही दिवसांपूर्वी सोलापुरात मोठी घोषणाही केली होती. ही घोषणा महिला मल्लांसाठी क्रांतिकारी ठरण्याची शक्यता आहे. 


तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला मान
दरम्यान, आजपासून साताऱ्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा थरार रंगत आहे. तब्बल 59 वर्षांनंतर साताऱ्याला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजनाचा मान मिळालाय. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावण्यासाठी 900 पैलवान शड्डू ठोकून सज्ज आहेत.. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे गेले दोन वर्ष महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा झाली नव्हती. मात्र आता निर्बंधमुक्तीनंतर पुन्हा एकदा साताऱ्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडणार आहे. त्यामुळे पैलवान आणि कुस्तीप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtra Kesari : कोण उंचावणार मानाची गदा? आजपासून आखाड्यात रंगणार 'महाराष्ट्र केसरी'चा थरार


कोण होणार यंदाचा 'महाराष्ट्र केसरी'?