सातारा : रयत शिक्षण संस्थेचे (rayat shikshan sanstha) संस्थापक अध्यक्ष कर्मवीर भाऊराव पाटील (karmaveer bhaurao patil) यांनी घटना लिहली होती. त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हा रयतचा अध्यक्ष असला पाहिजे असा उल्लेख आहे. मात्र काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ती घटना बदलली. रयत शिक्षण संस्थेचे खासगीकरण होता कामा नये. ज्या लोकांची पात्रता नाही त्या लोकांना रयतच्या बॉडीवर घेतलं जातं याचे दुःख वाटते अशी टीका कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
"माझी उंची 6 फूट असून शरद पवारांची उंची माझ्यापेक्षा 2 इंचाने मोठी आहे. पवारांनी वंशपरंपरेने पुढील पिढीला रयतचे अध्यक्षपद दिल्यास रयत संस्थेसाठी फार मोठा धोका निर्माण होईल. ज्यांना समाजातील कसलीच जाण नाही अशांना या संस्थेवर घेतल्याची टीका करत जनतेचा विचार करून शरद पवार (sharad pawar) रयतचे अध्यक्षपद सोडतील अशी खोचक टीका आमदार महेश शिंदे यांनी केली आहे.
आमदार महेश शिंदे म्हणाले, "रयतला देणगी दिली म्हणून मालकी दाखवणं चुकीचं आहे. आज रयतमध्ये नोकरी लावण्यासाठी खुलेपणाने 40 लाख रुपये मागितले जात आहेत. बारामतीच्या एकाच व्यक्तीला रयतचे काम दिले जात असल्याने संशयाचे वातावरण निर्माण होत आहे."
उदयनराजेंना रयतच्या बॉडीवर घेतले नाही ही संपूर्ण महाराष्ट्राची खदखद आहे. राजकीय ताकद असल्याने ही संस्था ताब्यात गेली असून हे चुकीचे आहे. राजघराण्याने ही जागा रयत संस्थेच्या मुख्यालयाला दिली आहे. पात्रता नसणारे लोक रयत शिक्षण संस्थेवर गेल्याने संस्थेला धोका निर्माण झाला आहे. पारिवारिक 9 जण रयत संस्थेमध्ये घेतली असून त्यांचे रयतसाठी योगदान काय आहे? असा सवाल आमदार महेश शिंदे यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Corona New Cases : कोरोना रुग्णांमध्ये 6.4 टक्क्यांची घट, 24 तासांत 1 लाख 68 हजार नवे कोरोनाबाधित
- राजेश टोपे पहिल्यांदाच म्हणाले, होय, तिसरी लाट आलीय, जानेवारी अखेरीस उच्चांक गाठण्याची शक्यता
- Omicron in India : तिसर्या लाटेचा कहर? ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या चार हजारांवर, पाहा तुमच्या राज्यातील परिस्थिती