1. रुग्णालयात दाखल होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून राज्यांना सतर्कतेचा इशारा, तर चाचणीसंदर्भात आयसीएमआरची नवी नियमावली
2. राज्यात सर्व ठिकाणी सात दिवसाचा विलगीकरण कालावधी, आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती, तिसरी लाट सुरु झाल्याचंही वक्तव्य
3. मुंबईकरांना काहीसा दिलासा, काल दिवसभरात 13 हजार 648 रुग्णांची नोंद, तर 27 हजार 214 जण कोरोनामुक्त
4. उत्तर प्रदेशात आणि गोव्यात पुन्हा भाजपचंच कमळ , तर पंजाबमध्ये आपची झाडू कमाल दाखवण्याची शक्यता, सी व्होटरचा ओपिनियन पोल
5. उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळं महाराष्ट्राचाही पारा घसरला, अनेक जिल्ह्यात 10 अंशाखाली तापमानाची नोंद, तर रब्बीला अवकाळीचा फटका
देशात थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. जम्मू-काश्मीरपासून राजस्थानमध्ये ठंडी वाढत आहे. उत्तर, पश्चिम आणि मध्य भारतात किमान तापमाणात घट झाली आहे. तर आज देशातील बिहार, आसाम, अरूणाचल प्रदेश आणि मराठवाड्यातील काही भागांसह दक्षिण लामीळनाडू, केरळ व अंदमान निकोबारच्या काही भाात पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
मुंबई गारठली
राज्यात मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानात घट झाल्याने ठंडी वाढली आहे. पुढील दोन दिवसांत तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. सोमवारी नाशिक येथे राज्यातील सर्वात कमी म्हणजे 7.3 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगावात 9 अंश किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रात पुण्यासह, सांगली, सातारा, सोलापूर आणि अहमदनगरमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळ आल्याने थंडी वाढली आहे.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 11 जानेवारी 2022 : मंगळवार
6. ब्रेड दोन ते पाच रुपयांनी महागला, इंधन आणि वाहतूक दरवाढीचा फटका, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ
7. कर्ज नाकारलं म्हणून चक्क बँकेलाच आग लावली, कर्नाटकातल्या हावेरीमधली धक्कादायक घटना
8. मुंबईत जर्मन युद्धनौका दाखल होणार, या महिन्याच्या अखेरीस युद्धनौका मुंबईत येणार, चीनच्या वाढत्या मुजोरीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
9. यंदाचा आयपीएल रणसंग्राम महाराष्ट्रात होण्याची शक्यता, चार स्टेडियमवर सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार, पवारांनीही हिरवा कंदील दिल्याची माहिती
10. आजपासून भारत-दक्षिण आफ्रिका तिसरी कसोटी, विराट कोहली तंदुरुस्त, मोहम्मद सिराजच्या जागी ईशांत शर्माला संधी मिळण्याची शक्यता