Maharashtra Legislative Council Political Updates: सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी आज विधानपरिषदेत बोलताना एक भविष्यवाणी केली. शिवसेना नेते सचिन अहिर (Shiv Sena Leader Sachin Ahir) लवकरच भाजपमध्ये दिसतील, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एवढंच नाहीतर विरोधकांची अवस्था अश्वत्थामा सारखी होणार आहे, असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. 


सुधीर मुनगंटीवार विधानसभेत बोलताना म्हणाले की, "आमच्या पक्षामध्ये त्याग, तपस्या, बलिदान... यही भाजप की पहचान." मुनगंटीवारांनी हे वाक्य उद्गारताच भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हसले. तसेच, मुनगंटीवारांच्या म्हणण्याला विरोधकांनीही दाद दिली. पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, "परिवारही मेरी पहचान, असं भाजप काम करत नाही. बरोबर ना खडसे साहेब."


105 आमदार सध्या त्यागच करतायत असं मुनगंटीवारांना रोखत सचिन अहिर यांनी म्हटलं. यावर सचिन अहिर यांना प्रत्युत्तर देतना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सचिनभाऊ... सचिनभाऊ... मी आज एक भविष्यवाणी करतो. एक दिवस सचिन अहिरसुद्धा भाजपसोबत असतील. मी गंमत नाही करत, मी गांभीर्यानं सांगतोय."


अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला : सुधीर मुनगंटीवार 


अनिल परबांची अवस्था महाभारतातल्या अश्वत्थामासारखी नाही झाली, तर माझं नाव बदला, असं म्हणत सुधीर मुनगंटीवारांनी शिवसेना नेते अनिल परबांनाही टोला लगावला आहे. तसेच पुढे बोलताना नियम न पाहता समोरच्याला बोलूच द्यायचं नाही, मग एकेदिवशी पक्ष मायक्रोस्कोपमध्ये पहावा लागतो, सुधीर मुनगंटीवारांनी अनिल परबांना टोला लगावला आहे.


पाहा व्हिडीओ : Sudhir Mungantuiwar Monsoon Session : सचिन अहिर भाजपात येणार, सुधीर मुनगंटीवार यांची भविष्यवाणी



किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार


भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाला असून हा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. या प्रकरणाची सखोल आणि उच्च स्तरावर चौकशी होईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "जो विषय मांडला आहे तो गंभीर आहे. राजकारणात अनेक प्रसंग येत असतात. माझं म्हणणं आहे की माझ्याकडे पुरावे द्या. कोणालाही पाठिशी घालणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. कुठलंही प्रकरण दाबलं जाणार नाही. सखोल आणि वरिष्ठ स्तरावरील चौकशी केली जाईल."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Kirit Somaiya Video : किरीट सोमय्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी होणार : देवेंद्र फडणवीस