Aaditya Thackeray : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे 29 मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते दापोलीतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. परंतु, आमदार योगेश कदम आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आले आहे.  या दौऱ्याआधी आदित्य ठाकरे योगेश कदम यांच्या पाठीशी तर नाहीत ना? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.


दापोली नगरपालिका निवडणुकीवेळी माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचे राजकीय भवितव्य काय? 2024 मध्ये योगेश कदम यांना उमेदवारी मिळणार का? योगेश कदम भाजपमध्ये जाणार का? अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. परंतु, आदित्य ठाकरे यांच्या या दौऱ्यामुळे शिवसेनेची दुसरी पिढी योगेश कदम यांच्या पाठीशी असल्याचं आता स्पष्ट होत नाही ना? याबाबत तर्क लावले जात आहेत.


कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता शिवसेनेच्या  अंतर्गत वादाचा फायदा विरोधक घेणार नाहीत? याबाबत देखील सावधगिरी बाळगली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोकणातील राजकारण आणि येथील सर्व गणितं पाहता आदित्य ठाकरे यांचा दापोली दौरा महत्वाचा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा दापोली दौरा महत्वाचा असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.    


महत्वाच्या बातम्या