राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) फोन टॅपिंगप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.  या नोटीशीनंतर देवेंद्र फडणवीस हे उद्या बीकेसी (BKC) पोलिस स्टेशनमध्ये उपस्थित राहणार आहेत. फडणवीस यांना नोटीस बजावल्यानंतर भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरच आता भाजपचे वेगवगेळे नेते आपली प्रतिक्रिया देत आहेत. अशातच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस अशा नोटिशीला भीक घालत नाहीत, ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. विरोधी पक्षनेते असताना सुद्धा त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. फडणवीस हे पोलिसांना पूर्ण सहकार्य करतील आणि या प्रकरणात दूध का दूध पानी का पानी होईल, असं ते म्हणाले आहेत.


दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी? : आशिष शेलार 


याप्रकरणी आपली प्रतिक्रिया देताना भाजपा आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''घोटाळ्यात थेट सहभाग दिसतो म्हणून चौकशीला बोलावले की, राजकीय सूडबुद्धी असे तुणतुणे वाजवता.'' ते म्हणाले आहेत की, ''घोटाळा झाल्याचे ज्यांनी उघड केले त्यांनाच दोषी असल्यासारखे चौकशीला बोलावता ही काय बालबुध्दी?'' त्यांनी राज्य सरकारला इशारा देत म्हटलं आहे की, लक्षात असू द्या, झुकणार नाही!''


घड्याळ अडचणीत आले , म्हणून चौकशीला बोलावलं : प्रसाद लाड


याप्रकरणी बोलताना भाजपा आमदार प्रसाद लाड म्हणाले आहेत की, ''देवेंद्र फडणवीस उद्या पोलिसांना पूर्ण सहकार्य करतील. आम्ही काही आमदार देखील त्यांच्या सोबत जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांचा चरित्रावर अशा पद्धतीचे आरोप क्रूर बुद्धीने केले जात आहेत. याचा करारा जबाब मिळेल.'' घड्याळ अडचणीत आल्याने फडणवीस यांना चौकशीला बोलावलं असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.


संबंधित बातम्या: