मुंबई : थेट मंत्रालयात जाऊन गावगुंडांनी रील करण्यापासून ते पार गृहमंत्र्यांच्या पक्षाच्या आमदारानेच मुख्यमंत्र्यांच्या नेत्यांवर गोळीबार करण्यापर्यंत राज्यात गँगवाॅर चांदा ते बादा माजला असतानाच आता शिवसेना ठाकरे गट आणि भाजपमध्ये वंदे भारतमधील प्रवासावरून सुद्धा उकाळ्या पाखाळ्या काढण्याचा उद्योग सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण नेमकं चाललं आहे तरी कोणत्या दिशेनं? अशी प्रतिक्रिया वक्त होत व्यक्त होत आहे. 






शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी असा दोन दिवसांचा दौरा केला. यानंतर त्यांनी वंदे भारतमधून हे प्रवास केला. आता वंदे भारतमधून प्रवास केल्यानंतर भाजपकडून खोचक शब्दात टिप्पणी करण्यात आली. ठाकरे गटाकडूनही भाजपच्या ट्विटला खोचक प्रत्युत्तर देण्यात आले. महाराष्ट्र भाजपच्या ट्विटरवर मोदी सरकारच्या विकासाचे लाभार्थी, वंदे भारत ट्रेनचा आरामदायी प्रवास, तिसरी बार मोदी सरकार अशी खोचक टिप्पणी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचा फोटो शेअर करून देण्यात आली. 






त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. कोस्टल रोड, एमटीएचएल ही ठाकरेंची गॅरेंट होती पण क्रेडिट घेण्यासाठी पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनाची घाई होते आणि एमटीएचएल अनेक महिने तयार असूनही उद्घाटनाला विलंब झाला आणि आता कोस्टर रोड तयार नसून उद्घाटनाची घाई चालली आहे, पण तुम्ही कितीही घाई केली तरी मुंबईचे हाल करणारे खोके सरकारला जनतेच्या मनात क्रेडिट मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया देण्यात आली. 






या ट्विटवरही भाजपकडून प्रतिक्रिया देण्याता आली. आयत्या प्रकल्पांवर उबाठा. घरात बसून बाबरी ढाच्या उध्वस्त केल्याचे श्रेय लाटल्यानंतर प्रस्तुत आहे "MTHL अटल सेतू" आणि कोस्टल रोड. तुम्ही फक्तं आम्ही केलेल्या कामांची श्रेय लाटू शकता तुमच्या विकासाची गॅरंटी मातोश्री १ ते मातोश्री २ या पलीकडे नाही हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.


तत्पूर्वी सुद्धा एक भाजपकडून ट्विट करण्यात आलं होतं त्यामध्ये हीच तर #ModiKiGuarantee कुठे आहे विकास ? म्हणून ओरडणारे उबाठा जेव्हा वंदे भारत ट्रेन मधून प्रवास करून लाभार्थी होतात तेव्हा समाधान वाटतं. लवकरच बुलेट ट्रेनची देखील सफर घडवून आणणार हे नक्की कारण #ModiHaiToMumkinHai


इतर महत्वाच्या बातम्या