मुंबई: मध्य प्रदेश, राजस्थानसह देशातील पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. त्या संबंधित निवडणूक आयोगाने आजच घोषणा केली. पण त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी प्रश्न विचारला आहे. देशात पाच राज्यांच्या निवडणुका (Five States Assembly Election Dates) जाहीर केल्या गेल्या, पण चंद्रपूर आणि पुणे लोकसभेची पोटनिवडणूक का जाहीर करण्यात आली नाही हे मला जाणून घ्यायचं आहे. या दोन्ही जागा सहा महिन्यांहून जास्त काळ रिक्त असल्या तरी निवडणूक आयोगाने निवडणुका का घेतल्या नाहीत असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

आदित्य ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना निवडणूक आयोगाला प्रश्न विचारला आहे. 

 

पाच राज्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे,

मिझोरम- 7 नोव्हेंबरछत्तीसगड-7,  17 नोव्हेंबरमध्यप्रदेश- 17 नोव्हेंबरराजस्थान -23 नोव्हेंबरतेलंगणा- 30 नोव्हेंबर

 

 

ही बातमी वाचा: