पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे बाराव्या फेरीअखेर 60 हजार मतांनी आघाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांचा प्रवास हा विजयाकडे सुरू असून त्यांनी निकालाआधीच पेढे भरवून जल्लोष साजरा केला. कोल्हेंच्या नातेवाईकांनी त्यांना पेढे भरवले. त्याचवेळी अमोल कोल्हे यांनी गाईंना पेढे भरवल्याचं दिसून आलं. 


शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून विरोधी उमेदवार शिवाजी आढळराव पाटील हे मागे पडल्याचं चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात आघाडी मिळाली आहे. आपल्या गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मताधिक्य  मिळाल्याने मंत्री वळसे पाटील यांना हा मोठा धक्का समजला जातो.


निकालाआधीच जल्लोष


अमोल कोल्हेंनी आघाडी घेतल्यानंतर आता त्यांच्या घरासमोर आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे. त्यात अनेक कार्यकर्ते अमोल कोल्हेंना पेठे भरवण्यासाठी पोहचले आहेत. कुटुंबीय आणि कार्यकत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. पुढील काहीच तासात निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. 


अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला


राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरुरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अर्थाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी लढत होती. त्यात अजित पवारांनी शिरुर लोकसभा जिंकण्याचा चंग बांधला होता आणि आढळराव पाटलांचा शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश घेऊन त्यांना उमेदवारी दिली होती. शिरुरमध्ये आढळराव पाटील यांना जिंकून आणण्यासाठी अजित पवारांनी मोठे प्रयत्न केले. यावेळी प्रचारादरम्यान थेट टीका करण्यात आली. कांद्याच्या प्रश्नावरुन टीका करण्यात आली. आता मात्र आढळराव पाटील हे पिछाडीवर दिसत आहे. त्यामुळे शिरुरमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता दिसत आहे. 


शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या निरगुडसर या गावात आघाडी मिळाली.आपल्या गावात प्रतिस्पर्धी उमेदवाराला मताधिक्य  मिळाल्याने मंत्री वळसे पाटील यांना हा मोठा धक्का समजला जातो. बाराव्या फेरीअखेर डॉ. कोल्हे अंदाजे 60 हजार मतांनी पुढे आहेत.


ही बातमी वाचा: