Madha Loksabha Result 2024 :  माढा लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel mohite patil) हे 8000 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsinh Nimbalkar) हे पिछाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आल्याने मारुती जाधव यांनी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijay Sinha Mohite Patil ) यांना शिवरातन बंगल्यावर जाऊन पहिला गुलाल लावला आहे. 


पहिल्या दोन फेरीत धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर


माढा लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत महत्वाची मानली जातेय. संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या मतदारसंघात पणाला लागली आहे. या मतदारसंघातील सुरुवातीचे काही कल हाती आले आहेत. पहिल्या दोन फेरीत धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत. मोहिते पाटील हे 8500 मतांनी आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर हे पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जातोय. 


माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


माढा लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. कारण या मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबाने भाजपची साथ सोडत शरद पवार गटात प्रवेश करत या निवडणूक लढवली आहे. भाजपने पुन्हा रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळं मोहिते पाटील नाराज होते. धैर्यशील मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, भाजपने नकार दिल्याने धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. त्यामुळं ही लढत अत्यंत तुल्यबळ मानली जातेय. कारण 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस मतदारसंघातून मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना एक लाख मताधिक्य दिलं होतं. मात्र, यावेळी खुद्द मोहिते पाटील उभे असल्यानं त्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. या मतदारसंघात भाजपच्या उमेदवारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली होती. तर महाविकास आघाडीकडून देखील शरद पवार यांनी मोहिते पाटील यांच्यासाठी सभा घेतली होती. त्यामुळं या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळं या मतदारसंघात कोण निवडून येणार हे थोड्याच वेळात समजणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! माढ्यातून पहिल्या फेरीत धैर्यशील मोहिते पाटील 5000 मतांनी आघाडीवर, निंबाळकर पिछाडीवर