Maharashtra Loksabha Election Result :अवघ्या राज्याचे लक्ष टाकून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार या पिछाडीवर आहेत. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या पहिल्या फेरीपासूनच बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आघाडीवरती आहेत.


सुप्रिया सुळे यांनी दुसऱ्या फेरी अखेर 11532 मतांनी आघाडीवरती आहेत. सर्वाधिक लक्ष लागून आलेल्या बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धाम महायुतीच्या पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.






कोकणमधील रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये सुद्धा जोरदार चुरस सुरु आहे. पहिल्यांदा पिछाडीवर गेल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. त्यामुळे कोकणमध्ये जोरदार चुरस आहे. 






महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये फिफ्टी-फिफ्टी लढत सुरू असून सर्व जागांवर जोरदार चुरस सुरु आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये महाराष्ट्राच्या 48 जागांचा अंदाज समोर आला असून भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे.






शिंदे गट सात जागांवर आघाडीवर आहे, तर अजित पवार गट एक जागेवर आघाडीवर आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे 9 जागांवर पिछाडीवर आहे. पाच जागांवर शरद पवार गट आघाडीवर आहे. काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे. इतर 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या