धुळे : जिल्ह्यातील शिरपूर येथे गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपयांचा बनावट मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 


धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अजंदे शिवारातील पद्मावती कापूस खरेदी विक्री केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिनिंगमध्ये सुरु असलेल्या बनावट मद्याच्या कारखान्यावर मुंबई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 9 जून रोजी धाड टाकली. या कारवाईत एक कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करीत हा कारखाना उध्वस्त करण्यात आला होता. मुंबई येथील पथकाने केलेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली होती.


धुळे जिल्ह्यात एवढा मोठा बनावट मद्याचा कारखाना सर्रासपणे सुरु असल्याची माहिती असून देखील स्थानिक अधिकारी काय करतात? असा प्रश्न उपस्थित झाला होता. या कारवाईची गांभीर्याने दखल घेत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठांनी धुळे येथील राज्य उत्पादन शुल्क निरिक्षक, दुय्यम निरीक्षक आणि जवान या पदावरील पाच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच या प्रकरणी जिल्हा अधीक्षकांची ही तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.


महत्वाच्या बातम्या :