शिर्डी :  मिशन बीगिन अगेन अंतर्गत शिर्डीतील साईबाबा मंदिर 16 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुलं झालं. त्यानंतरच्या 71 दिवसात सुमारे 12 लाख 2192 भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं आहे. या 71 दिवसांमध्ये शिर्डी संस्थानला तब्बल 32 कोटी 3 लाख 43 हजार 900 रुपयांचे भरभरुन दान प्राप्त झालं आहे. शिर्डी संस्थानच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे. शिर्डीचं साई मंदिर हे देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक आहे.


कोविड महामारीमुळे देशभरात लॉकडाऊन झाला. यानंतर मिशन बीगिन अगेन अंतर्गत नियमांमध्ये शिथिलता आणली आणि काही गोष्टी सुरु झाल्या. देशभरातील काही मंदिरं सुरु झाली तरी महाराष्ट्राती धार्मिक स्थळं बंद होती. त्यानंतर धार्मिकस्थळं उघडण्यासाठी राज्यात आंदोलनं झाली. मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्यास परवानगी दिली.


यानंतर मंदिरांमध्ये नियमांचं पालन करत दर्शनाला सुरुवात झाली. शिर्डीचं साई मंदिर 16 नोव्हेंबरपासून भाविकांसाठी खुलं झालं. भाविकांच्या दर्शनावेळी कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन केल्याचे संस्थानचे सीईओ कान्होराज बगाटे यांनी सांगितलं.


शिर्डी साईसंस्थानमध्ये असे जमा झाले दान


रोख देणगी - 6 कोटी 18 लाख 70 हजार 361


मनीऑर्डर - 50 लाख 71 हजार 979


ॲानलाईन देणगी - 6 कोटी 39 लाख 1 हजार 896


डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे देणगी - 2 कोटी 62 लाख 28 हजार 326


चेक, डीडीहारे देणगी - 3 कोटी 5 लाख 89 हजार 626


परकीय चलन - 22 लाख 60 हजार 165


दक्षिणा पेटीतील देणगी - 13 कोटी 4 लाख 20 हजार 547


एकूण प्राप्त देणगी - 32 कोटी 3 लाख 42 हजार 900


सोने आणि चांदी - 796 ग्रॅम सोने आणि हजार ग्रॅम चांदीचेही