देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. राष्ट्रीय किसान मजदूर संघटना आणि भारतीय किसान युनियनची आंदोलनातून माघार, 1 फेब्रुवारीचा संसद मार्च देखील तूर्तास स्थगित, हिंसक आंदोलनाचा शेतकरी नेत्यांवर ठपका


2. दिल्ली हिंसाचारानंतर ट्विटरने केली 550 हून अधिक अकाउंटवर कारवाई, नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका


3. पुढचा महिनाभर स्विमिंग पूल आणि थिएटर पूर्ण क्षमतेनं सुरु करण्यास मुभा, तर 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता


4. येस बँकेचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर राणा कपूर यांना ईडीकडून अटक, मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी कारवाई


5. भाजपच्या वेबसाईटवर रक्षा खडसेंच्या नावाखाली आक्षेपार्ह शब्द, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून दखल, कारस्थान की तांत्रिक घोळ याचा सस्पेन्स कायम


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 जानेवारी 2021 | गुरुवार | ABP Majha



6. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या नावानं खंडणी, पुणे पोलिसांकडून भामट्याला अटक


7. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील मांढदेवीची यात्रा यंदा रद्द; मंदिर सजलं, मात्र भाविकांविना मांढरदेवी गडावर शुकशुकाट


8. भिवंडीत कपड्याच्या गोदामाला भीषण आग, कामगार वेळीच बाहेर पडल्यानं अनर्थ टळला


9. नुकतंच उद्घाटन झालेल्या नागपुरातल्या अजनी-वंजारीनगर दरम्यानच्या पुलावर स्टंटबाजी, व्हिडीओ व्हायरल, तर चंद्रपुरात स्टंटबाजी करताना दुचाकीस्वार कोसळला


10. आयपीएल 2021 साठी चेन्नईत पार पडणार खेळाडूंचा लिलाव, आयपीएलच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरुन माहिती, दिग्गज खेळाडूंवर लागणार बोली