शिर्डी : शिर्डीत अल्पवयीन तरुणीवर बापलेकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी मुलगा पसार झाला असून पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे.


घराजवळ राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीला आरोपी पितापुत्राने फूस लावली. पीडितेला घरी बोलवल्यानंतर दोघांनीही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

आरोपी मुलगा धनंजय देशमुख पसार झाला आहे. तर 49 वर्षीय पिता गजानन देशमुख यांना गजाआड करण्यात आलं आहे. शिर्डी पोलिसांनी ही कारवाई केली.