मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास 11 ठिकाणचे उमेदवार निश्चित करून प्रचारात आघाडी घेतलेल्या उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे (Shilpa Bodkhe) यांनी त्यांच्या राजीनामा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे पाठवला आहे. मुंबईच्या कार्यालयात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या मनमानी कारभार करत असून त्यांनी संघटना विस्कळीत केली, तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या शब्दाला त्या किंमत देत नाहीत असा घणाघाती आरोप त्यांनी केला.  


 






शिल्पा बोखडे या ठाकरे गटाच्या प्रवक्त्या होत्या, त्यांनी सोशल मीडियावर ठाकरे गटाची बाजू उत्तमरित्या मांडली होती. आता त्यांनी राजीनामा दिल्यानंतर हा पक्षासाठी मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. 


काय म्हणाल्या शिल्पा बोखडे?


आपण शिवेनेच्या पूर्व महिला आघाडी संपर्क प्रमुख व प्रवक्ता या पदावर प्रामाणिकपणे काम करत संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला. पण शिवसेना भवनात बसून विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांनी सतत षडयंत्र रचून वारंवार संघटन विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला असे मला वाटतं. 


शिवसेना पक्षात शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आणि शिवसेना नेते आदित् ठाकरे यांच्या शब्दाला किंमत आहे, पण आता मला कळाले की येथे विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर यांच्याकडे पक्षाचे पूर्ण अधिकार दिले असून पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दाला देखील त्या जुमानत नाहीत. 


मी पक्षाचे अहोरात्र प्रामाणिकपणे काम करत राहिले आणि विशाखा राऊत आणि रंजना नेवाळकर या शिवसेना भवनात बसून षडयंत्र रचत बसल्या. 


मला सोशल मीडियाचे काम करायचे नाही असं पत्र मी आदित्य ठाकरे यांना पाठवले, परंतु विशाखा राऊत यांना मी काम करून नये आणि त्रस्त होऊन राजीनामा द्यावा असं वाटत आहे. 


जर यांना संघटना वाढवण्यापेक्षा षडयंत्र रचण्यात एवढा आनंद होत असेल तर मी आपल्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्क प्रमुख आणि प्रवक्ता पदाचा राजीनामा देत आहे. 


माझा पक्षात टिश्यू पेपर म्हणून वापर केल्याबद्दल धन्यवाद.


पुढे कोणाचे असेल राजकीय आयुष्य बरबाद करून नका, नाहीतर कोणताही मराठी माणूस मराठी माणसाच्या आणि पक्षाच्या पाठिशी उभा राहणार नाही. 


कारण शिवसेना पक्षात काम करणाऱ्या लोकांपेक्षा येथे चुगल्या चहाड्या करणार्या आणि षडयंत्र रचणाऱ्यांना जास्त महत्व आहे. 


ही बातमी वाचा: