Ambadas Danve On Shasan Aplya Dari : शिर्डीजवळच्या काकडी गावात शासन आपल्या दारी (Shasan Aplya Dari) कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची देखील उपस्थितिती होती. दरम्यान याच कार्यक्रमासाठी परिवहन महामंडळाच्या 600 एसटी बसचं (ST Bus) नियोजन करण्यात आले होते. जिल्हाभरातील 26 हजार लाभार्थ्यांच्या प्रवासासाठी या बसेस ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे काही आगारात ग्रामीण भागातील आणि शाळकरी मुलांसाठी सोडण्यात येणाऱ्या शालेय फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर, यावरूनच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सरकार आणि शासन आपल्या दारी कार्यक्रमावर टीका केली आहे. "शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी" असे म्हणत दानवे यांनी सरकारला खोचक टोला लगावला आहे. 


दानवे यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, “शासन येई दारी, विद्यार्थी बसे घरी". सरकार आपल्या दारी येत असल्याचा देखावा करून एखाद्या आगराच्या सगळ्या बस अडकवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणे, हे कोणत्या तत्वात बसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदय अश्या फेऱ्या रद्द होणार होत्या, तर शेजारील आगारातून अतिरिक्त बसची सोय का करण्यात आली नाही?, का विद्यार्थी वेठीस धरता? हेच कित्ते इतर ठिकाणीही गिरवले जात असल्याचं, दानवे म्हणाले. 


आगारात लागले फलक... 


शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी परिवहन महामंडळाच्या 600 बसचं नियोजन करण्यात आल्याने अनेक आगारातील बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, संगमनेर आगारात लावण्यात आलेल्या फलकाचे फोटो अंबादास दानवे यांनी ट्विट केले आहे. ज्यात लिहले आहे की,“ 17 ऑगस्ट रोजी शिर्डी येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी राज्य परिवहन संगमनेर आगाराच्या 63 बसेस पाठवण्यात येणार असल्याने, ग्रामीण व शालेय फेऱ्या 17 ऑगस्ट रोजी पूर्णपणे बंद राहणार आहेत. तसेच नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, शेवगाव, पाथर्डी या मार्गावर बस उपलब्ध झाल्यास वाहतूक करण्यात येईल. तरी सर्व प्रवाशांनी व विद्यार्थ्यांनी सूचनेची नोंद घ्यावी. तर, 16 ऑगस्ट रोजी सर्व मुक्कामी जाणाऱ्या बसेस बंद राहतील".






फडणवीसांकडून शरद पवारांना उत्तर...


शासन आपल्या दारी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'मी पुन्हा येईन' घोषणेवर भाष्य केले आहे. 2019  साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही, असं फडणवीस म्हणाले. मी म्हणालो होतो मी पुन्हा येईल,अजून देखल त्याची दहशत आहे. 2019 साली काही लोकांच्या बेईमानीमुळे मी येऊ शकलो नाही. मात्र ज्यांनी आमच्याशी बेईमानी केली त्यांचा संपूर्ण पक्ष घेऊन आलो. तसंच, आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार आहे, असा टोला देखील त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. ते शिर्डी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत होते. राज्यात अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजवणी सुरू असल्याचं, फडणवीस म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Devendra Fadnavis: आमचं सरकार फेसबुक सरकार नव्हे तर फेस टू फेस सरकार , देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला