Sharad Pawars NCP faction allotted ‘Man Blowing Turha’ : निवडणूक आयोगाकडून शरद पवार (Sharad Pawar) गटाला तुतारी हे चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगाने (Election commission) राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केलंय. दरम्यान 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत. 


तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाकडून रायगडावर या चिन्हाचा लॉन्चिंग करत लोकसभा निवडणुकांसाठी रणशिंग फुंकण्यात येणार आहे. शनिवारी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते रायगडावर उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


दरम्यान, काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर आता पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. 


'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार' पक्षाचं नवीन चिन्ह... #तुतारी

वाजली #तुतारी म्हणजे लढाईला तोंड फुटलं...#तुतारी वाजवा अन् अहंकारी विचारांना गाडा..#तुतारी वाजवा अन् महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढा..#तुतारी वाजवा अन् स्वराज्य परत आणण्यासाठी लढा.. #तुतारी वाजवा… pic.twitter.com/c0OcjKuFrE


February 22, 2024" href="https://marathi.abplive.com/news/maharashtra/ncp-sharadchandra-pawar-party-symbol-tutarivala-manus-election-commission-of-india-nationalist-congress-sharad-pawar-maharashtra-politics-update-1258600" data-="">

type="interlinkingkeywords"> 


राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद सर्वोच्च न्यायालयात


या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. 


आणखी वाचा :


Sharad Pawar : "एक तुतारी द्या मज आणुनि", शरद पवार गटाला चिन्ह मिळालं; 'तुतारीवाला माणूस' चिन्हावर निवडणुकीचे रणशिंग फुंकणार