पंढरपूर : सध्या राज्यात अतिशय घाणेरडे राजकारण सध्या विरोधकांनी सुरू केले आहे. शब्दाला कुठेही मर्यादा नाही, फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे. आता तर निवडणूक काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात करतील. त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावही मागून घ्यायला सुरुवात करतील, असं म्हणत शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी निशाणा साधला आहे. ते सांगोल्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी शहाजी बापूंनी अजितदादांना सबुरीचा सल्ला दिला आहे.
शहाजी बापू म्हणाले, राज्याचे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार देखील या घाणेरड्या राजकारणात सहभागी झाले आहेत. राजकारण 1952 सालापासून पाहत आले आहे परंतु सर्वात वाईट वातावरण विरोधकांनी सध्या तयार केले आहे. नको तशी भाषा वापरली जाते. टीका करताना शब्दाला कोणतीही मर्यादा राहिलेली नाही. फक्त आया बहिणींवर शिव्या देणे शिल्लक ठेवले आहे. आता तर निवडणूक काळात उद्धव ठाकरे, शरद पवार, जयंत पाटील आमच्या आई बहिणीवर शिव्या द्यायला सुरुवात करतील. त्यासाठी आमच्या आया बहिणींची नावही मागून घेतील आणि म्हणतील आम्हाला शिव्या द्यायच्या आहेत.
घाणेरड्या राजकारणाची सुरूवताच उद्धव ठाकरेंनी केली : शहाजी बापू
तुम्ही सुपाऱ्या दुसऱ्यांच्या गाडीवर टाकल्यावर तुमच्या गाडीवर नारळ पडतीलच. तुम्ही सुपाऱ्या टाकल्यानंतर समोरच्यांनी बघतच बसायचे का? असा सवाल शहाजी बापू पाटलांनी केला आहे. मुळात या राजकारणाची सुरूवताच उद्धव ठाकरेंनी केली आहे. त्यांनी हे सगळे थांबवावे, असे देखील शहाजी बापू म्हणाले.
शहाजी बापूंना अजितदादांना दिला सबुरीचा सल्ला
शहाजी बापू पाटील म्हणाले, अजित दादांची खंत त्यांच्या दृष्टीने योग्य आहे. पण या राज्यात राजकारणात अनेक असे नेते आहेत, त्यांना शेवटपर्यंत संधी मिळालेली नाही. अजितदादांनी धीर सोडू नये. दादा प्रामाणिकपणे प्रशासन चालवणारा नेता आहे. अजितदादा यांनी नाउमेद होऊ नये . नेतृत्व करण्याची संधी कर्तृत्व आणि भाग्य एकत्र आल्यावर मिळते . वसंतदादा , शंकरराव चव्हाण यांनाही कोणत्या वयात मिळाली हे पाहावे. अजितदादांनी नेतृत्वाची संधी मिळेल. पण सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असून त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुती जिंकेल.
हे ही वाचा :