काँग्रेसला पुन्हा उभं करायचं असेल तर काँग्रेस सोडून गेलेल्यांनी एकत्र यावं, अशा चर्चा दिल्लीत वारंवार होत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. मात्र तूर्तास तरी पुन्हा एकत्र येण्याचा मार्ग दिसत नाही असंही त्यांनी आवर्जून स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस टिकण्यासाठी पक्ष सोडून गेलेल्यांनी एकत्र आले पाहिजे अशी चर्चा दिल्लीतील राजकीय वर्तुळात होते. पण याबाबत अजून कोणताही प्रस्ताव नाही असंही शरद पवार यांनी या मुलाखतीत स्पष्ट केलं आहे. यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नेत्यांनी एकत्र यावे. यामुळे ते स्वत: काँग्रेस पक्षात विलीन होतील का या चर्चेला देखील सुरुवात होणार आहे.
शरद पवार यांनी दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्याचा तो मार्ग आहे. पण सध्या मला रस्ता दिसत नाही, असे उत्तर देऊन संदिग्धता मात्र कायम ठेवली आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होण्याच्या चर्चा सुरु होत्या. त्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.
'गांधी कुटुंबीय' हेच काँग्रेस सिमेंट आहे, ते पक्षाला एकत्र ठेवतात. असं असलं तरी त्यांनी गांधी परिवार म्हणजे काँग्रेस पक्ष असंही समजू नये असं मत पवार यांनी व्यक्त केलं आहे.