मुंबई : आजोबा आणि नातवामधील वाद आहे. यामध्ये आजोबांनी नातवाला किंवा नातवाने आजोबांना किंमत द्यायची की नाही हे त्यांचं त्यांनी ठरवायचं आहे. हा त्यांच्या घरातील प्रश्न आहे. परंतु त्यांनी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशी करण्या बाबत माझी काही हरकत नाही, असं स्पष्ट केलं आहे. ही भूमिका नक्कीच योग्य आहे असं मत विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.


देवेंद्र फडणवीस यांनी दहिसर चेक नाका येथे कोविड सेंटरला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी प्रविण दरेकर देखील उपस्थित होते.



प्रविण दरेकर म्हणाले, कुटुंबात संघर्ष आहे अशी चर्चा आहे. यामध्ये तथ्य वाटतंय. शेवटी नातवाला किंमत द्यायची की नाही हा आजोबांचा प्रश्न आहे. परंतु शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे की, माझी सीबीआय चौकशीला हरकत नाही. यावरून त्यांनी पार्थ पवार यांच्या मागणीला किंमत दिल्याचं दिसतंय. यासोबत पार्थ पवार यांना त्यांनी इमॅच्युअर म्हटलं आहे याचा अर्थ असा की, राष्ट्रवादी पक्षात अशा अपरिपक्व नेत्यांना लोकसभेची तिकिटं देण्यात येतात. शेवटी पार्थ पवार हे एक युवा नेतृत्व आहे. त्यांचं असं खच्चीकरण होणं योग्य नाही.


काय म्हणाले शरद पवार?


पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली होती. तशा आशयाचं पत्र त्यांनी गृहमंत्र्यांना दिलं होतं. यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. याविषयी शरद पवार म्हणाले की, "माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत नाही. त्यांचं वक्तव्य इमॅच्युअर आहे. सीबीआय चौकशी कोणाला करायची असेल, तर माझा महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर 100 टक्के विश्वास आहे. पण कोणाला सीबीआय चौकशीची मागणी करायची असेल त्यासाठी कोणाचा विरोध नसावा."


संबंधित बातम्या :