मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) कृषिमंत्री असताना त्यांनी काहीच न केल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात सत्ताधारी विरुद्ध वरोधक असा सामना रंगला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही. आज शरद पवारांनी थेट पत्रकार परिषद घेत मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. जाणून घेऊया या पत्रकार परिषदेतील दहा मुद्दे जाणून घेऊया
1) गहू आयातीचा निर्णय (Sharad Pawar On Wheat Imports)
2004 ते 2014 कृषीमंत्री मी होतो. 2004 ला देशात अन्नधान्य टंचाई होती. त्यावेळी पहिल्याच दिवशी कटू निर्णय मला घ्यावं लागला. अमेरिकेकडून गहू आयात करायला लागला. 2 दिवस मी त्या फाईलवर सही केली नव्हती. मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर मनमोहन सिंग यांचा फोन आला. त्यांनी 3 ते 4 आठवड्यात आपल्या समोर अडचण येऊ शकते असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं मी सही केली.
2) प्रत्येक पीकाच्या हमीभावात वाढ (Sharad Pawar On Crop Rate)
शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी पावलं उचलली पाहिजेत त्याचा पहिला निर्णय केला. हमी भाव वाढवण्यासाठी प्रयत्न केले. गहू कापूस सोयाबीन याच्या हमीभावात वाढ केली. ऊसाची किंमत 700 होती ती 2100 केली होती. प्रत्येक पीकासाठी प्रयत्न केले.
3) नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन (Sharad Pawar On National Horticulture Mission)
यूपीए सत्तेत असताना काही योजना सुरु केल्या. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन सुरू केले. यातून भाजीपाला उत्पादन वाढवलं
4) राष्ट्रीय कृषी योजना 2007 यामुळे कृषी क्षेत्राचा चेहरा मोहरा बदलला (Sharad Pawar On National Agriculture Plan 2007)
गहू तांदूळ कापूस सोयबीन यांच्या हमीभावात दुप्पटीने वाढ झाली. काही महत्वाकांशी कार्यक्रम हातात घेतले. नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन असे कार्यक्रम हाती घेतले. यामुळे देशाच्या कृषी क्षेत्राच चेहरा बदलला उत्तर भागात भात हे महत्वाचे पिक होते मात्र त्याचे उत्पादन कमी होते. अनेक नवीन योजना देशात सुरू केल्या. यामुळे शेतक-यांना प्रोत्साहन मिळाले.
5) आयात करणाऱ्या देशाला निर्यातदार बनवलं (Sharad Pawar On Export)
अन्न धान्याबाबत काही ठराविक राज्याचा उल्लेख होतो. यामध्ये बिहार आसाम सारख्या राज्यांत भात उत्पादन होतं परंतु ते कमी होतं म्हणून त्याच्या वाढीसाठी प्रयत्न सुरू केले. शहरी भागात भाजीपाला उत्पादन वाढीसाठी योजना सुरू केल्या. मत्सपालन वाढीसाठी राष्ट्रीय मत्सपालन बोर्डाची स्थापना केली. ज्या योजना राबवल्या त्यामुळं देश अन्न धान्याच्या बाबत स्वयंपूर्ण झाला
6) साखरेच्या निर्यातीवर बंदी उठवावी ( Sharad Pawar On Sugar Export)
ब्राझिल हा देश इथेनॉल उत्पन्न करणारा देश आहे. साखर आपल्या देशात जास्त आहे ती निर्यात करणे गरजेचं आहे परंतु त्यांनी साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारन साखर उत्पादकांसाठी निर्णय घ्यावा आणि निर्यात बंदी उठवावी
7) 62 हजार कोटींची कर्जमाफी ( Sharad Pawar On Loan waiver)
शेतकऱ्याच्या आत्महत्या होत होत्या त्या रोखण्यासाठी 62 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आलं. पीक कर्जाचा रेट 18 टक्के होता तो 4 टक्क्यांवर आला. काही जिल्ह्यात 0 टक्के व्याज आकारण्यात आलं.
8) दुष्काळी भागात चारा छावण्या (Sharad Pawar On Animal Sheltar)
2012 - 13 साली दुष्काळ निर्माण झाला त्यावेळी चारा छावण्या काढण्याचं काम केलं.नॅशनल हॉर्टिकल मिशन योजनेतून साडे दहा लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलं.
9) विक्रमी तांदूळ उत्पादन (Sharad Pawar On Rice production)
शेती क्षेत्रात दोन संघटना महत्त्वाच्या आहेत. 23 जानेवारी 2012 साली एका संघटनेने एक पत्र दिलं होतं यामधे नमूद करण्यात आले होते की, 2011 साली रेकॉर्ड ब्रेक तांदूळ उत्पादन आपण केलं आहे.
10. वर्षांत 7.7 अब्ज डॉलरवरून 42.84 अब्ज डॉलरवर (Sharad Pawar On Farmer Suicide)
एकेकाळी आयात करणारा देश निर्यातदार झाला 10 वर्षांत 7. 7 अब्ज डॉलर वरून 42. 84 अब्ज डॉलर वर गेली. शेतकऱ्याच्या आत्महत्या होतं होत्या त्या रोखण्यासाठी 62 हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ करण्यात आलं. पीक कर्जाचा रेट 18 टक्के होता तो 4 टक्क्यांवर आला. काही जिल्ह्यात 0 टक्के व्याज आकारण्यात आलं.
हे ही वाचा :