सांगली :  शरद पवार (Sharad Pawar PM) यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे अशी इच्छा माजी मंत्री महादेव जानकर यांनी  व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.  सांगलीमध्ये आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. महादेव जानकरांचे हे वक्तव्य पुन्हा एकदा  चर्चेत आले आहेत. पवार यांची राजकीय भूमिका पाहता अनेकांना त्यांनी पंतप्रधान व्हावे अशी इच्छा आहे


महादेव जानकर म्हणाले, शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे ही राष्ट्रीय समाज पक्षाची इच्छा आहे, शरद पवार आपण देशाचे पंतप्रधान व्हावे मी माझी इच्छा आहे. मोदी आणि तुमचं रिलेशन चांगलं आहे, थोडा धक्का द्या. आणखी दोन राज्यात परवानगी मिळाली की, माझी पार्टी भविष्यात राष्ट्रीय पार्टी होईल आणि मी खासदार होऊ शकेल.  महाराष्ट्रात आपण दोघं असल्यावर रान हाणून नेऊ. 


महादेव जानकर म्हणाले की,  एसटीच्या सवलती पवार साहेबांनीच दिल्या. आम्ही प्रयत्न केले. धनगर समाजासाठी एसटीच्या 13 योजना मी बनवल्या. 1 हजार कोटी रुपये दिले. मात्र अजून 1 हजार कोटी तुम्ही दिले. त्यामुळे एसटी समाजातील मुले भविष्यात आएएस, आयपीएस होतील. बाप हा बाप असतो आणि नेता हा नेता असतो. मी ही तीन चार आमदार केले. पहिलं आरक्षण शाहूंनी दिलं आणि होळकरांच्या घरी मुलगी देण्यात आली.  जयंत पाटील तुम्ही आम्ही पाहुणे होऊ शकतो. तुमची आणि आमची सोयरीक होऊ शकते.


या कार्यक्रमाला  जलसंपदामंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर आदींसह जिल्ह्यातील खासदार, आमदार यांची उपस्थिती होती. 


संबंधित बातम्या :