मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)  शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन जुना व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय. हा व्हिडीओ पोस्ट करताना घरातील लेक ही वंशाचाच नव्हे तर विचारांचाही दिवा तेवत ठेवू शकते, असा पुढारलेला विचार  शरद पवार साहेबांसारखा द्रष्टा नेताच रुजवू शकतो, असं लिहिण्यात आलंय. या व्हिडीओमध्ये शरद पवारांच्या एका मुलाखतीतला काही भाग पोस्ट केला आहे. ज्यात ते मुलीला मुलाप्रमाणे वाढवून, समान संधी देऊन तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो, असं बोलत आहेत. सह्याद्री वाहिनाला दिलेल्या मुलाखतीचा हा व्हिडीओ आहे. 


राष्ट्रवादी शरद पवार गटाने शरद पवारांच्या मुलाखतीचा   एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुलाखतकारांनी शरद पवारांना विचारले की,  आपल्या देशात मुलगा हा वंशाचा दिवा असे मानत असताना तुम्हाला एकच मुलगी का? या प्रश्नांना कसे सामोरे जाता? यावर शरद पवार म्हणाले, हा प्रश्न अनेकदा मला विचारला जातो. ग्रामीण भागात गेल्यानंतर हा प्रश्न मला कायम विचारला जातो. मुलगा असता तर बरे झाले असते. शेवटी नाव चालवण्यासाठी, बर वाईट झाल्यानंतर अग्नी देण्यासाठी मुलगा पाहिजे, असे म्हटले जाते. माझ्या मते हा प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. अग्नी देण्यासाठी कोणीतरी असला पाहिजे याची चिंता करायची का जीवंत असताना नीटनेटक वागण्याची चिंता करायची. 






मुलगा आणि मुलगी यांच्याकडे पाहण्याचा जो समाजाचा दृष्टीकोन आहे. तो टाकून दिला पाहिजे. मुलीला मुलाप्रमाणे वाढवून, समान संधी देऊन  आत्मविश्वास वाढवून तिच्याकडून उत्तम काम करुन घेऊ शकतो,याची खात्री मला आहे, असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे (NCP)अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वारसदार कोण असणार, नेतृत्व कुणाकडे असणार? अशी चर्चा अनेकदा होत असते. त्यानंतर शरदचंद्र पवार गटाकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण आले आहे. 


हे ही वाचा :


Rohini Khadse: बापाला लागले स्वगृही परतीचे वेध, पण लेकीनं निर्धाराची तुतारी वाजवली! खडसेंच्या लेकीचा मोठा निर्णय!