मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar NCP) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. शरद पवारांनी आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांच्या प्रश्नावरुन केली. राज्यात गेल्या काही दिवसांपासून अनेक तरुणी आणि महिला बेपत्ता असल्याचं शरद पवार म्हणाले. याशिवाय शरद पवारांनी कंत्राटी भरतीला कडाडून विरोध दर्शवला, तसंच कायम स्वरुपी भरती करावी अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे केली.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था याबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूरबाबत वेगळी चर्चा सुरु आहे. पावसाळी अधिवेशनात काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये असं लक्षात आलं की 1 जानेवारी 2023 ते 31 में 2023 या कालावधीत राज्यांत 19 हजार 553 तरुणी आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत. 1453 मुली आहेत उर्वरित महिला आहेत.
राज्याची स्थिती गंभीर आहे. आवश्यक खबरदारी आणि उपाय योजना करणे गरजेचं आहे. तरुण मुलांची भेट झाली त्यांनी शासकीय भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याबाबत चिंता व्यक्त केली. तरुणांचं म्हणणं आहे की पोलीस दलात कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. 11 महिनेसाठी ही भरती आहे. त्यानंतर या मुलांनी काय करायचं हा प्रश्न आहे. संबधित कर्मचाऱ्यांना पोलीस विषयाची ज्ञान आणि प्रशिक्षण नसेल तर ही चिंतेची बाब होईल
राज्यात जी यंत्रणा आहे ती सक्षम केली तर अडचण येणार नाही माझी मागणी आहे की कायम स्वरुपी भरती करावी
6 सप्टेंबर 2023 रोजी एक निर्णय जाहीर केला यामध्ये बाह्य यांत्रणे मार्फत सेवा पुरवण्यासाठी कंत्राट देण्याचा निर्णय झाला.
काही हॉस्पिटलमध्ये बाल रुग्ण मृत्यू झाले अनेक सरकारी रुग्णालयात जागा रिक्त आहेत त्या ठिकाणी 2800 जागा तात्पुरत्या पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.
काही शाळा खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला. शिक्षकांची नेमणूक कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
खाजगी कंपन्या शाळा दिल्या तर काय होऊ शकतं याचं उदाहरण म्हणजे एका मद्य कंपनीला शाळा देण्यात आली नाशिक जिल्ह्यात. तिथं गौतमी पाटील हिच्या नृत्याचा कार्यक्रम तिथं करण्यात आला. ही गोष्ट अतिशय चिंतेची आहे.
20 पेक्षा कमी पट सांख्या असेल तिचे समायोजन करण्यात येते. आता शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. याचा मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होईल. तर प्राथमिक शाळांची 30 हजार पदं रिक्त आहेत. कंत्राटी पद्धतीने भरती होत असताना त्यामध्ये आरक्षण तरतूद नाही
एक दिवसात खासदारकी रद्द, मग परत द्यायला इतका वेळ का?
खासदार फैजल मोहम्मद यांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. कोर्टाने निर्णय देऊन देखील अजूनही त्यांची खासदारकी परत देण्यात आलेली नाही. एक आठवडा झाला निर्णय अद्याप घेतलेला नाही. संसदेने त्यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय एका दिवसांत घेतला मात्र ती परत बहाल करण्याचा निर्णय आठवडा होऊन देखील घेतला नाही
विदर्भ मराठवाडा खानदेश येथे कापूस पीक महत्वाचं आहे. केंद्राने काहीं निर्णय घेतले आहेत. यांदा कापूस कमी उत्पन्न झाल आहे. त्याला भाव चांगला मिळेल अशी अपेक्षा होती. आयात करण्याला त्यांनी सवलती दिल्या
सध्या उत्पादन खर्च निघत नाही असं कापूस उत्पादकांच म्हणणं 5आहे
आम्ही कोर्टात गेलो होतो आमचं निरीक्षण असं होतं की जाणीवपूर्वक विलंब लावण्यात येत होतं. आमची मागणी आहे विशिष्ट कालावधीत हा निर्णय घ्यायला हवा
ड्रग्जप्रकरणात कोण?
ड्रग्ज प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढतं आहे. यामागे कोण आहे तत्काळ शोधायला हवं कारण राज्यभरात हे प्रकार उघडकीस येत आहे, असं शरद पवार म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांचा वेळकाढूपणा
आम्हाला असं वाटतंय की विधानसभा अध्यक्ष सातत्यानं वेळ लावत आहेत. असे वाटतेय की विधानसभा निवडणुकांपर्यंत हा निर्णय ते खेचतील. त्यामुळं आम्ही कोर्टात गेलो आहे, असं शरद पवारांनी सांगितलं.
अकोल्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांवर निशाणा
दरम्यान, शरद पवार यांनी काल अकोल्यात पत्रकार परिषद घेत, अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. अजित पवार हे मुख्यमंत्री होतील हे स्वप्न आहे, त्या प्रत्यक्षात घडणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते.
Sharad Pawar PC LIVE : शरद पवार यांची पत्रकार परिषद
संबंधित बातम्या