मुंबई: राज्याच्या राजकारणात अनेकदा महिला मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा रंगतात. यामध्ये सर्वात आधी खासदार सुप्रिया सुळेंचं (Supriya Sule) नाव घेतलं जातं. त्यावर आज शरद पवारांनी (Sharad Pawar) एबीपी माझाच्या माझा महाकट्टावर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (पवार गट) अध्यक्ष शरद पवार शरद पवार (Sharad Pawar) यांना आगामी निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि सुप्रिया सुळे (Sharad Pawar) मुख्यमंत्री होतील अशी चर्चा सुरू आहे, एक बाप म्हणून आणि एका पक्षाचे अध्यक्ष म्हणून काय वाटतं असा प्रश्न विचारण्यात आला होता. 


या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले, "इथं काहीही झालं तरी राज्य सरकार आमच्या लोकांच्या हातात आलं पाहिजे आणि आम्ही ते आणणार. आणि एकदा हे ठरवलं की अ ब क व्यक्ती महत्वाची नाही. तो एकत्र  निर्णय होईल. अर्जुनाला जसा माशाचा डोळा, तशी आमच्या मनात महाराष्ट्राची सत्ता, बाकी काही नाही". 


तर याच प्रश्नावर उत्तर देताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, मला संसदेत महाराष्ट्राचा मधु दंडवते होण्याची फार इच्छा आहे. जिथे त्यांचं नाव आहे तिथे नेहमी मला असं वाटतं की आपलं देखील नाव त्या बोर्डावर लागलं पाहिजे. 


मराठा-ओबीसी वाद, शरद पवार अखेर मैदानात, बीड जालन्यात जाऊन तळ ठोकणार



"महाराष्ट्रातील जालना, बीड यासारख्या जिल्ह्यांत अस्वस्थता आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यावर मी शांतपणे जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहे.  कटुता, अवविश्वासाचं चित्र दसतंय. हे भयावह आहे. मी कधीही महाराष्ट्रात असं ऐकलेलं नाही. एका समाजाचं हॉटेल असेल तर दुसऱ्या समाजाचे लोक तिथं चहा घ्यायलाही जात नाहीत, असं मी महाराष्ट्रात कधीही ऐकलेलं नाही. हे काहीही करून बदललं पाहिजे. लोकांमध्ये विश्वास वाढवला पाहिजे. संवाद वाढला पाहिजे. आमच्यासारख्या लोकांनी यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे," अशी भूमिका शरद पवार यांनी स्पष्ट केली.