Sharad Pawar on Amol Kolhe : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांची भूमिका साकारल्यानं वाद निर्माण झाला आहे. या वादात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हे यांची पाठराखण केली आहे. कोल्हे यांनी कलाकार म्हणून ही भूमिका केली आहे. कलाकार म्हणून मी कोणत्याही कलाकाराच्या प्रत्येक भूमिकेचं स्वागत करतो, अशा शब्दांत शरद पवार यांनी अमोल कोल्हे यांची पाठराखण केली आहे. एखादी भूमिका साकारली म्हणून कलाकाराला तो विचार मान्य असतो असं नाही, असं पवार यांनी म्हटलं आहे. 


अमोल कोल्हेंची पाठराखण करताना काय म्हणाले शरद पवार? 


गांधी यांच्यावरचा सिनेमा अमेरिकेतून प्रसिद्ध झाला. नाव मला आठवत नाही, पण अॅक्टर म्हणून ज्याने ही भूमिका केली, तो गांधी सिनेमा सगळ्या जगात गाजला, गांधींचं महात्म्य जगात त्याच्यामुळं आलं. त्या सिनेमातसुद्धा कुणीतरी नथुराम गोडसेची भूमिका केली होती. 


नथुराम गोडसेची भूमिका केली तो आर्टिस्ट होता, नथुराम गोडसेने कुठल्याही चित्रपटात, आर्टिस्ट एखादी भूमिका घेत असेल तर ती आर्टिस्ट म्हणून भूमिकेकडे पाहिलं पाहिजे. 


उदाहरणार्थ, शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात एक काळ होता ज्यामध्ये संघर्ष झाला. त्याच्यात समजा राजे शिवाजी सिनेमामध्ये तुम्ही शिवाजीची भूमिका घेत असेल, तुम्ही औरंगजेबाची भूमिका घेत असेल, तर जो औरंगजेबाची भूमिका घेत असेल तर तो त्यात मुघलांचा समर्थक होत नाही. तो कलावंत म्हणून त्या ठिकाणी भूमिका घेतो. 


 किंवा रामराज्यसंबंधी सिनेमा असेल, तिथे राम आणि रावण यांच्यातील संघर्ष असेल,त्या सिनेमात रावणाची भूमिका घेणारी व्यक्ती रावण असू शकत नाही, एक कलाकार म्हणून त्याच्याकडे पाहायचं. किंवा 
सीतेचं अपहरण केलं याचा अर्थ प्रत्यक्षात सीतेचं अपहरण त्या कलाकाराने केलं असं होत नाही. रावणाच्या इतिहास त्या माध्यमातून दाखवायचा हा प्रयत्न केलेला आहे. 


आणि त्यामुळे अमोल कोल्हेंनी यासंबंधीची भूमिका घेतली असेल ती कलावंत म्हणून केली, मला माहिती आहे,  अमोल कोल्हेंनी जेव्ही ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. आणि हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाहीय.अमोल कोल्हेंनी केलेली भूमिका एक कलावंत म्हणून केलेली आहे. अमोल कोल्हेंनी जेव्ही ही भूमिका केली तेव्हा ते आमच्या पक्षातही नव्हते. आणि हा सिनेमा अजून बाहेरही आलेला नाहीय.
मुद्दा फक्त एकच आहे, कलावंत म्हणून त्यांनी ही भूमिका कधी केली असेल तर याचा अर्थ गांधीजींच्या विरुद्ध काहीतरी आहे असा नाही. किंवा नथुराम गोडसेने जे काम केलं आहे त्यामुळे संबंध देश हा अस्वस्थ, नाराज , दु:खी आहे, त्या नथुरामचं महत्व वाढवण्याचं कोणताही उद्देश नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नाकडे एक कलावंत आणि या देशात घडलेला इतिहास या दोन गोष्टींना समोर ठेवून आपण बघितलं पाहिजे.


भाजप हे गांधीवादी कधीपासून झाले? भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि या सगळ्यांचा जुना इतिहास, त्याबाबत मी इथे भाष्य करु इच्छित नाही. पण एक काळ असा होता की गांधींच्यांसंबंधी वेगळी भूमिका घेणाऱ्या ज्या शक्ती होत्या त्या शक्ती सध्या कुठे आहेत ते बघितलं पाहिजे, त्यावर त्यांनी बोलावं. 


कलावंत म्हणून मी कोणत्याही कलाकाराचा सन्मान करतो. 


पाहा व्हिडीओ : शरद पवारांकडून अमोल कोल्हेंकडून पाठराखण



दरम्यान, अमोल कोल्हे... राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार... मात्र अमोल कोल्हे म्हटलं की, डोळ्यासमोर उभी राहते ती त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजेंची भूमिका. मात्र हेच अमोल कोल्हे आता नथुराम गोडसेच्या भूमिकेत दिसणार आहेत. नथुराम म्हणजे, ज्याने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या केली आहे. कोल्हे यांच्या 2017 साली चित्रीत झालेल्या WHY I KILLED GANDHI या चित्रपटातील नथुराम गोडसेच्या भूमिकेवरुन वाद निर्माण झाला आहे. हा चित्रपट आता लाईमलाईट या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटात कोल्हे यांनी साकारलेली भूमिका अनेकांना रुचलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही कोल्हे यांनी साकारलेल्या नथुरामच्या भूमिकेला विरोध केला आहे. दरम्यान महात्मा गांधींजींच्या हत्येचं कधीही समर्थन केलेलं नाही असं कोल्हे यांनी म्हटलं आहे. तसंच नथुरामचं उद्दातीकरण केलं नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


शरद पवारांकडून अमोल कोल्हेंचं थेट समर्थन, औरंगजेब-रावणाचा दाखला, भाजपला म्हणाले, तुम्ही गांधीवादी कधीपासून?