Sharad Pawar : आज केंद्र सरकार शेतकऱ्यांकडे (Farmers) दुर्लक्ष करत आहे. शेतीला भाव नाही. कांदा निर्यातीवर बंधने आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी सरकारवर टीका केली. एवढा मोठा जिल्हा असताना देखील या शेतकऱ्यांची नाशिक जिल्हा बँक (Nashik Bank) आजारी आहे. प्रचंड थकबाकी झाली आहे. आज केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाहीत. त्यामुळं शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर नाशिकमध्ये पार पडत आहे. या कार्यक्रमात ते बोलत होते.
नाशिकच एक वैशिष्ट म्हणजे उत्तम शेती करणारा हा जिल्हा आहे. शेतीवर नाशिककरांचे लक्ष आहे. आधुनिक शेतीचा विचार करणारा हा शेतकरी आहे. नवनवीन प्रयोग इथ पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील शेतकरी संघर्ष करण्यासाठी रस्त्यावर उतरला होता, शरद जोशी यांच्या नेतृत्वात शेतकरी रस्त्यावर उतरला होता याची सुरुवात नाशिकमध्ये झाली होती असं पवार म्हणाले. कांद्याचे सोयाबीनचे उत्पन करणारा जिल्हा म्हणजे नाशिक आहे. भारत हा कृषी प्रधान देश आहे, त्याला जोडधंदा हा दुधाचा आहे. शेतीतील गोष्टी आपण अमेरिकडून घ्यायला लागलो तर शेती अडचणीत येईल असे शरद पवार म्हणाले. राज्यात 1 हजार 183 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये विदर्भातील शेतकरी जास्त आहेत. राज्य सरकार बघ्याची भूमिका घेत असेल तर अवघड आहे असे पवार म्हणाले. लोकसभा निवडणुकांत भास्कर भगरे, शोभा बच्छाव आणि वाझे निवडून आले. तिन्ही जागा आपल्या विचाराच्या निवडून आल्याचे शरद पवार म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे गरजेचं
देशाचा नकाशा काढा पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहे. बांगलादेश उध्वस्त झाला आहे, त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने कसता खाल्ल्या होत्या. तो आपल्यासोबत नाही, श्रीलंका आपल्यासोबत नाही. देशाची धुरा मोदींच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे असे शरद पवार म्हणाले. ट्रम्प यांची निती प्रत्येक वस्तूवर टॅक्स लावण्याची आहे असं पवार म्हणाले.
महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागलीय
हैदराबाद गॅझेटवर आधारित निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं. पण या गॅझेटमध्ये काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हीजेएंटी बंजारा यांना आदिवासीच स्थान यामध्ये देण्यात आले आहे. आता बंजारा समाजाने मागणी सुरू केली आहे. काही झालं तरी चालेल पण आता आम्हाला आदिवासीमध्ये घातलं पाहिजे. याचा अर्थ काय तर समासामाजामध्ये कटूता वाढेल असे निर्णय घेतलेजात आहेत असं पवार म्हणाले. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे पवार म्हणाले.
सरकारच्या कमिट्या कधी एका समाजाच्या करायच्या नसतात
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ओबीसी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सगळे ओबीसी नेते आहेत. तर दुसरीकडे मराठा समाजासाठी जी समिती नेमण्यात आली तर त्यात महाजन सोडले तर सगळे मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या कधी एका समाजाच्या करायच्या नसतात असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
आपला पक्ष गांधी नेहरु विचारधारेवर चालणारा
महाराष्ट्रातील महत्वाच शहर नाशिक आहे. आपला पक्ष गांधी नेहरु विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. नाशिकचा इतिहास पाहिला तर या जिल्ह्यात गांधी नेहरु विचारधारा या लोकांनी स्वीकारली होती. स्वातंत्र्याच्या पूर्वी नाशिकला एक अधिवेशन झालं होतं वर्किंग कमिटी बैठक झाली होती महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. गांधी नेहरू विचार पुढे घेऊन जाण्यांच काम नाशिककरंनी केल्याचे शरद पवार म्हणाले. त्यानंतर भाऊराव हिरे, गोविंदराव देशपांडे यांनी विचारपुढे नेला. मराठी साहित्यात योगदान देणारे अनेक लोक याठिकाणी होऊ गेले. महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत कुसुमाग्रज यांच नाव घेतल्या शिवाय साहित्य पुर्ण होतं नाही. यशवंतराव चव्हाण सारखा महाराष्ट्राला मोठा नेता मिळाला. राज्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारा हा नेता होता असे शरद पवार म्हणाले.
जवाहरलाल नेहरु यांनी भारताला सावरायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला बोलवायला हवं म्हणून यशवंतराव चव्हाण यांना दिल्लीत बोलवून घेतलं होतं. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेताच रात्री लगेच चिनने सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी यशवंतराव चव्हाण यांना नाशिक जिल्ह्यातून खासदार म्हणून बिनविरोध पाठवलं होतं अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.
महत्वाच्या बातम्या:
शिक्षकांवर ही वेळ येऊ देऊ नका, एक दिवसात प्रश्न मार्गी लावा 56 वर्ष मी विधानसभा लोकसभा राज्यसभेत काम केलंय, निधीची तरतूद कशी करायची मला माहीत आहे; शरद पवारांकडून सरकारला खडे बोल