सातारा: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सभागृहाचा दरवाजा न उघडल्याने आतच अडकले.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी सकाळी 11 च्या सुमारास पत्रकार परिषद घेतली.

या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार सभागृहाच्या बाहेर पडण्यासाठी निघाले. मात्र दरवाजा पूर्णत: लॉक झाल्यामुळे पवारांना ताटकळत उभं राहावं लागलं.

अनेक जण दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते. मात्र काही केल्या दरवाजा उघडतच नव्हता. सुमारे दहा मिनिटाच्या प्रयत्नानंतर हा दरवाजा उघडला आणि शरद पवार बाहेर आले.



10 मिनिटं पवार सभागृहात अडकले

पत्रकार परिषद सुरु असताना काही पत्रकार आत येण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दरवाजा लॉक झाल्याचं लक्षात आलं. शरद पवारांचे कार्यकर्ते, पत्रकार, कर्मचारी, आमदार, पदाधिकारी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते.

परंतु दहा मिनिटांच्या काळात पवारांच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव नव्हते. ते सगळ्यांना शांत राहण्यास सांगत होते. तसंच त्यांनी मिश्लिकपणे ही घटना हाताळली.