Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नंतर आज खासदार संजय राऊत आणि त्यांचे बंधू आमदार सुनिल राउत यांना देखील फोनवरून धमकी आल्याचा प्रकार समोर आला आहे आणि त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे. शरद पवार यांना काही झालं तर त्यासाठी राज्याचे आणि देशाचे गृहमंत्री जबाबदार असतील असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारण महाराष्ट्राचं या नावाच्या ट्विटर खात्यावरुन तुमचा दाभोळकर करु आशा आशयाची जिवे मारण्याची धमकी आली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात गेल्याचं पहायला मिळालं. यावेळी सुप्रिया सुळे यांनी थेट राज्याचा आणि देशाच्या गृहमंत्र्यांना इशारा दिल्याचं पाहिला मिळालं.


एकिकडे शरद पवार यांना धमकीचा मेसेज आला तर शिवसेना खासदार संजय राऊत यांना आणि त्यांचे बंधू आमदार सुनील यांना देखील फोनवरून धमकी आली. धमकी देणाऱ्याने संजय राऊत यांनी सकाळची पत्रकार परिषद बंद करावी अथवा भावासह जिवे मारण्यात येईल असं म्हटलं आहे. 


List Of Leaders Who Got Threat : आतापर्यंत धमक्या आलेले नेते


1) राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना जानेवारी महिन्यात धमकी. धमकी देणाऱ्या तरुणाने वारांवर कृत्य केल्याचं समोरं


2) नितीन गडकरी यांना 22 मार्च रोजी बेळगावच्या कारागृहातून धमकीचा फोन. काही दिवसांत एक संशयित तरुणी ताब्यात.


3) संजय राऊत यांना लॉरेन्स बिष्णोई गँग आणि ठाण्यातील एका बड्या गुंडकडून धमकी.


4) 10 मे 2022 ला उत्तर भारतीयांची माफी मागावी यासाठी राज ठाकरे यांना फोनवरून धमकी. 


5) माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपद्वारे धमकी, कर्नाटकातून जयसिंग रजपूत नावाच्या व्यक्तीला अटक.


6) 2020 साली तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून धमकी.


आज घडलेल्या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेची गंभीर दखल घेत कुठल्याही राजकीय व्यक्तीला धमकी देणे खपवून घेणार नसल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी गृहखातं तत्काळ कारवाई करेल असं आश्वासन देखील दिलं आहे


विरोधी पक्षाने मात्र राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याची टीका सरकारवर केली आहे. जयंत पाटील यांनी टीका करताना धमकी देणाऱ्याला दोन तासात अटक व्हायला हवी होती, मात्र अद्याप अटक झालेली नाही असं म्हटलं. जर खरच चौकशी झाली तर याचे मूळ कदाचित दाभोलकर हत्याकांडापर्यंत जाऊ शकेल असंही त्यांनी म्हटलं. 


महाविकास आघाडी सरकारच्या काळात सातत्याने मंत्र्यांना किंवा राजकीय व्यक्तींना येणाऱ्या धमक्या थांबवण्यासाठी कडक कायदा करण्याची भूमिका घेण्यात आली होती. मात्र काही कालावधीत राज्यातील सरकार पालटंल त्यामुळे आता सध्याचं सरकारं याबाबत काही भूमिका घेणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.


ही बातमी वाचा :