सातारा ड्रग्ज माफिया ललित पाटीलला (Lalit Patil Drug Case) बेड्या ठोकल्यानंतर त्याने गौप्यस्फोटांची मालिका सुरु करण्याचे संकेत दिले आहेत.    शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे (Dada Bhuse), शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर आरोप करत ललित पाटील प्रकरणात  नाव घेतलं यानंतर आता शंभुराज देसाईंनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. ललित पाटीलला मी ओळखत नाही. कारण नसताना माझे नाव घेतले जात असून सुषमा अंधारेंना नोटीस नोटीस पाठवणार असल्याची माहिती शंभुराज देसाई यांनी एबीपी माझाला दिली आहे.


शंभुराज देसाई म्हणाले, सुषमा अंधारेंचे  वक्तव्य हास्यास्पद आहे. लवकरच मी त्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार आहे.  ललित पाटिलला मी ओळखत नाही कारण नसताना माझे नाव घेतले जात आहे. सुषमा अंधारेंना कायदेशीर नोटीस देणार आहे. ललित पाटील प्रकरणात माझा थोडा  संबंध जरी सापडला तला मी राजकारण सोडेल. 


सुषमा अंधारेंचे वक्तव्य ही तिकिट मिळवण्यासाठीची धडपड


सुषमा अंधारे यांचे वक्तव्य बेजबाबदार आहे. अंधारे या निवडून येऊ शकत नाहीत म्हणून उध्दव ठाकरे यांनी त्यांना खासदारकी किंवा आमदारकी द्यावी यासाठीचा त्यांचा असा प्रयत्न सुरू आहे. लाखो लोकांमधून आम्ही निवडून येतो. अंधारेंची त्यांची सगळी तिकिट मिळवण्यासाठी धडपड आहे, असे शंभुराज देसाई म्हणाले. 


काय म्हणाल्या सुषमा अंधारे?


ललित पाटीलला पळवून लावण्यात राजकीय नेते सहभागी आहेत. ललित पाटीलसोबत (Lalit Patil) दादा भुसे आणि शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai) यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे सोपवा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. 


सुषमा अंधारेंचे यापूर्वीचे आरोप


दरम्यान, ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात (Sasoon Hospital Drug Racket) मंत्री दादा भुसे (dada bhuse) यांच्या सोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी 13 ऑक्टोबरला केला होता. या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या होत्या. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, पुरावे लवकरच समोर आणणार, असा दावा अंधारेंनी केला होता.  



हे ही वाचा :


Lalit Patil CP Press Live : ललित पाटीलला कसा पकडला? मुंबई पोलिसांनी क्लू सांगितला