shakambhari purnima in 2022 : आज शाकंभरी पौर्णिमा. महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेवी गडावरील काळूबाईची यात्रा (Mandhardevi Gad Kalubai Yatra) शाकंभरी पोर्णिमेला भरते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षापासून या गडावरच्या काळूबाईची यात्रा भरवण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यात यंदाच्या वर्षी काळूबाईचे दर्शन होईल असं भाविकांना वाटत होतं. मात्र ओमायक्रॉनमुळे यंदाच्याही वर्षी मांढरदेवी गडावर यात्रेच्या दिवशी येण्यास भाविकांना बंदी घालण्यात आली आहे.
भाविकांना बंदी घालण्यात आली असली तरी दरवर्षीप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांमार्फत आणि गावातील ठराविक मानकऱ्यांच्या उपस्थितीत आज यात्रा पूर्ण केली जात आहे. भाविकांनी गडावर येऊनये यासाठी पंचक्रोशीतील सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले असून गडावर भाविकांना येण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काळूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याच्या पौर्णिमेला असते, तिलाच शाकंभरी पौर्णिमा किंवा चुडी पौर्णिमा असेही म्हणतात.
समुद्रसपाटीपासून 5000 फूट उंचीवर असलेल्या वनराईत विराजमान झालेल्या काळूबाईचे स्थान भौगोलिकदृष्टया शंभू-महादेवाच्या डोंगररांगेत पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांच्या तसेच वाई - भोर- खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीवर शिखरावर वसले आहे.
काय आहे अख्यायिका
द्वापार युगाच्या अखेरीस दैत्यराजा रत्नासूराचा सेनापती देवीलाख्यासूराच्या त्रासापासून ऋषीमुनींची सुटका व्हावी म्हणून मंडाबाईनेच आदिमाया पार्वती देवीला हाक मारली होती. म्हणूनच देवी तिच्या हाकेला धावून आली. या युद्धात काळभैरवनाथाने देवीला साहाय्य केले. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री दैत्याला ठार केले. मांढव्यऋषींच्या नावावरून देवीचे नाव मांढरदेवी व गावाचे नाव मांढरदेव असे पडले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या:
काढायलाही परवडत नाही म्हणून झाडावरच पिकतायेत केळी! शेतकरी हवालदिल; केळीच्या बागा केल्या उध्वस्त