लातूर : एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात समोर आला आहे. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, त्यांच्या नात्यातीलच एका इसमानं ओळखीचा फायदा घेत तीनही मुलींशी शारीरिक संबंध ठेवले.
लातूर शहरात या तीनही मुली आपल्या आईसोबत राहतात. आरोपीनं ओळखीचा फायदा घेत सतरा, चौदा आणि अकरा वर्षांच्या या तीनही मुलींसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र सततच्या अत्याचाराला कंटाळून सतरा वर्षांच्या मुलीनं गांधी चौक पोलिस स्टेशन गाठलं आणि या प्रकाराचा उलगडा झाला.
पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. तीनही मुलींची वैद्यकीय तपासणी सुरु असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढचा तपास केला जाणार आहे. आरोपीवर कलम 376 (2)(n )कलम 4 ,6 ,8 अंतर्गत पॉक्सो लावण्यात आला आहे . लातूरसारख्या शहरात नात्यातील इसमानेच अशाप्रकारे तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्यानं सर्वच जण हादरुन गेले आहेत.
लातुरात एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर
Updated at:
19 Nov 2017 11:48 AM (IST)
एकाच घरातील तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार लातुरात समोर आला आहे. पीडित मुली या आपल्या आईसोबत राहतात, त्यांच्या नात्यातीलच एका इसमानं ओळखीचा फायदा घेत तीनही मुलींशी शारीरिक संबंध ठेवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -